Pakistan Army Chief Asim Munir During India Rawalpindi Strikes Hideout in Bunker
इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून लष्करी संघर्ष सुरु होता. पहलगाम हल्ल्यानंतर बारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या या कारवाईनंतर हा संघर्ष सुरु झाला होता. दरम्यान १० मे रोजी ६ मे ते १० मे पर्यंत चार दिवस चालल्या या संघर्षावर पूर्णविराम लावण्यात आला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन हाणून पाडले होते. याच वेळी भारताने लाहोर ते रावपिंडीपर्यंत केलेल्या पाकिस्तानी कारवाई दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी युद्धच्या भूमीवरुन पळ काढला होता. असीम मुनीर भारताच्या हल्ल्याला घाबरुन एका बंकरमध्ये जाऊन लपले होते. सुमारे तीन तास असीम मुनीर बंकरमध्ये लपून राहिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बारताने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून लाहोर ते रावपिंडीदरम्यान कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यावेळी भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नीर कान एअरबेसवर हल्ला केला होता. यावेळू असीम मुनीर एअरबेसपासून काही अंतरावर असलेल्या सरकारी निवस्थानात उपस्थित होते. हल्ल्याची माहिती मिळताच असीम मुनीर यांना तातडीने बंकरमध्ये नेण्यात आले होते. पूर्ण हल्ल्यांदरम्यान असीम मुनीर बंकरमध्ये लपून राहिले होते.
भारताने रावळपिंडीतील नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याची माहिती मिळताच मुनीर यांनी निवसस्थानातून पळ काढला. त्यानंतर त्यांना लष्करी जवानांनी बंकरमध्ये जाण्यास सांगितले. मुनीर यांनी देखील तिथून पळ काढला आणि जवळपास हल्ले संपेपर्यंत तीन तास बंकरमध्ये राहिले.
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतविरोधी उकसवणारी विधाने केली होती. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान मुनीर यांच्याकडे पाकिस्तानच्या अण्वस्त्रे चालवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे रिमोट मुनीर यांच्याकडे आहे. लष्करप्रमुख हे पद पाकिस्तानमध्ये सर्वात शक्तीशाली मानले जाते. सर्व महत्त्वाचे निर्णय लष्करप्रमुखाच्या हातात असतात.
भारताने हल्ला केला त्यावेळी लष्करी असीम मुनीर त्यांच्या निवासस्थानात एकटेच होते. भारतासोबतच्या तणावादरम्यान त्यांच्या कुटुंबाला ब्रिटनला पाठवण्यात आले. यावर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली.
भारताने पाकिस्तानच्या रावळपिंडीतील नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. हल्ल्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. नूर खान एअरबेस हे पाकिस्तानसाठी एक महत्वाचे लष्करी तळ आहे. या ठिकाणी पाकिस्तानची सर्वात शक्तीशाली हवाई उपकरणे तैनात करण्यात आली आहेत. तसेच चिनी हवाई संरक्षण प्रणाली देखील या ठिकाणी आहे, जी भारताने उद्ध्वस्त केली आहे.