मुइज्जूचा तोरा आता तरी उतरणार का? भारताने मालदीववर पुन्हा एकदा दाखवली दया, केली कोट्यवधींची मदत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारताने पाकिस्तानसोबतचया तणावादरम्यान आपल्या तिजोरीतून मालदीवला मोठी मदत केली आहे. या मदतीची सध्या मोट्या प्रमाणात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने आपल्या शेजारी सागरी देशाला मालदीवला ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची म्हणजे ४२३ कोटी रुपयांची मदत ट्रेझरी बिल जारी करत केली आहे. या मदतीनंतर मालदीवने भारताचे आभार मानले आहेत.
भारताच्या या मदतीनंतर मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील यांनी सरकराचे आभार मानले आहे. खलील यांनी मालदीव संकटात असताना भारताने केलेल्या मदतीचे कौतुक केले आहे. त्यांनी ही मदत दोन्ही देशांतील दृढ मैत्रीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एख निवेजन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, भारताने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर किमतीच्या ट्रेझरी बिलच्या रोलओव्हरमध्ये मालदीवला आर्थिक मदत पुरवली आहे.
याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो.खलील यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आमि बारत सरकारचे आभार मानले आहे. भारताची ही मदत मालदीवला संकटाच्या काळात करण्यात आली आहे. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेसाठी सुधारणा राबिवण्याच्या योजनेला पाठिंबा मिळाला आहे.
I express my sincere gratitude to EAM @DrSJaishankar and the Government of #India for extending crucial financial support to the #Maldives through the rollover of the USD 50 million Treasury Bill.
This timely assistance reflects the close bonds of friendship between #Maldives &…
— Abdulla Khaleel (@abkhaleel) May 12, 2025
मालदीवमधीलभारतीय उच्चायुक्तालयानेही यासंबंदी एक निवदेन जारी केले आहे. या अधिकृत निवदनात सांगण्यात आले आहे की, मालदीव सरकारच्या विनंतीवरुन, स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ने ५० दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत मालदीवला दिली आहे. ही मदत एका वर्षासाठी करण्यात येत आहे.
उच्चायुक्तालयाने हेही सांगितले की, मार्च २०१९ पासून बारत सरकारने एसबीआयकजून अशा ट्रेझरी बिलांचे वर्गणीदार बनण्याची सुविधा देते. दरवर्षी मावलदीव सरकराल व्याजमुक्त मदत दिली जाते. मालदीवला आपत्कालीन आर्थिक मदत म्हणून सरकार-ते-सरकार असा अंतर्गत करार करण्यात आला आहे.
मालदीवमधील उच्चायुक्तालयाने म्हटले की, मालदीव हा भारताचा एक प्रमुख सागरी शेजारी देश आहे. भारताच्या शेजारी प्रथम धोरणाता आणि महासागराच्या दृष्टीकोनातून या प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासठी भारत एक महत्वाचा भागीदार आहे. मालदीवमधील उच्चायुक्तालयाने म्हटले की, मालदीव हा भारताचा एक प्रमुख सागरी शेजारी देश आहे. भारताच्या शेजारी प्रथम धोरणाता आणि महासागराच्या दृष्टीकोनातून या प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासठी भारत एक महत्वाचा भागीदार आहे.
यामुळे भारताने यावर्षाच्या सुरुवातीला मालदीवला त्यांना लागणाऱ्या आवश्यक वस्तूंच्या निर्यातीसाठीच्या कोट्यात विशेष वाढ केली आहे. या निर्णयावरुन भारत आपल्या शेजारी प्रथम धोरणाला किती महत्व देतो हे लक्षात येते. मालदीवचे अध्यक्ष खरं तरं चीनचे समर्थख आहेत. त्यांनी सत्तेत येताच इंडिया आऊट ही पॉलिसी स्वीकारली. त्यामुळे भारतासोबतचे करार मालदीवच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी धोकादायक असल्याचे मानले जात आहे.