Pakistan Army Chief Asim Munir Promoted As Field Marshal despite defeat by India
इस्लामाबाद: भारतासोबतच्या लढाईत पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आहे. मात्र यानंतर पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. पाकिस्तानचे शाहबाज सरकार अजूनही विजयाचा दावा करत जनतेला मुर्ख बनवत आहे. अशा परिस्थितही पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना बढती देण्यात आली आहे. पाकिस्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदी नियुक्त केले आहे. शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संघीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यता आला. या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी भारत-पाकिस्तानच्या स्थितीबद्दल माहिती दिली.
असीम मुनीर हे पाकिस्तानचे दुसरे मार्शल फील्ड बनले आहे. पाकिस्तानमध्ये हे पद सर्वोच्च मानले जाते. यापूर्वी जनरल अयुब खान यांना ही पदवी मिळाली होती. खरं तरं त्यांनी स्वत:च फील्ड मार्शल म्हणून स्वत:ला घोषित केले होते. असीम मुनीर यांनी २०२२ पासून पाकिस्तानच्या लष्करप्रमुख पदी कामकाज पाहिले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये एकमेकांविरोधात तिरस्काराच्या भावना निर्माण करणारे व्यक्त केले होते. त्यांनी हिंदू-मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. मुस्लिम हिंदूपेक्षा वेगळे असून आमचे विचार, धर्म आणि पंरपरा वेगळ्या आहेत. त्यांनी याला द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरस्कार म्हटले होते.
त्यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक पिढीने देशासाठी बलिदान दिले आहे आणि पुढील पिढ्यांना पाकिस्तानचे वास्तव समजवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले होते. पाकिस्तानमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करणे असा त्यांचा उद्देश होता असे सांगितले जाते. परंतु त्यांनी काश्मीरविरोधात विधान केल्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली होती.
असीम मुनीर यांच्या या विधानंतर भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची अड्डे उद्धवस्त केले. ऑपरेशन सिंदूर मोहीमेअंतर्गत भारताने ही कारवाई केली. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले केले, परंतु भारताना पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानच्या छावण्या आणि लष्करी तळे उद्ध्वस्त केली आहे. परंतु यानंतरही पाकिस्तान विजयाचा झेंडा घेऊन फिरत आहे.