पाकिस्तानला घेरण्याच्या तयारीत भारत? NSA अजित डोभाल यांची इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा सचिवांशी चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: भारत आणि इराणमधील संबंध अलीकडच्या काळात अधिक दृढ होत चालले आहेत. याच वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली अकबर यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. या संवादादरम्यान भारत आणि इराणमदील व्यापार संबंधावर चर्चा करण्यात आली. मुख्यत: चाबहार बंदर प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरवर चर्चेदरम्यान भर देण्यात आला.
अजित डोभारल यांनी भारताच्या प्रादेशित स्थिरतेमध्ये इराणच्या रचनात्मक भूमिकेचे कौतुक केले. तसेच त्यांनी भारत इराणसोबत चाबहार बंदर प्रकल्पावर संबंध मजबूत करण्यास इच्छुक असल्याचेही डोभाल यांनी अली अकबर यांना सांगितले. तसेच दोन्ही नेत्यांनी राजकीय आर्थिक सहाकर्याच्या क्षेत्रांवरही चर्चा केली. इराणचे सचिव अहमदियान यांनी मध्य आशियात प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी चाबहार प्रकल्प महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले.
पाकिस्तानसोबतच्या तणादरम्यान भारत आणि इराणमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारत आणि इराणचा चाबहार बंदर प्रकल्प मजबूत झाल्यास भारत मध्य आशियात पाकिस्तानच्या पुढे जाईल. तसेच ही चर्चा पाकिस्तानला चहूबाजूनी घेरण्यासाठी रणनीतीक दृष्टीकोनातून तयारी असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भारतासाठी व्यापराच्या दृष्टीकोनातून इराणचे चाबहार बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताला जगभरात व्यापर वाढ करायची असल्यास चाबहार बंदर यामध्ये प्रमुख भूमिका बजावू शकते. या बंदरावरुन भारत इराण, अफगाणिस्तान, अर्रेनिया, अझबैजान, रशिया, मध्य आशियाशी व्यापर करु शकतो. तसेच या बंदरावरुन थेट युरोपीय देशांशी व्यापार देखील करता येईल. यामुळे २०१८ मध्ये भारताने इराणशी चाबहार बंदरासाठी करार केला होता. याअंतर्गत भारताने ३,७५० कोटी रुपये इराणला मजूंर केले होते.
चाबहार बंदरामुळे भारताला आपला माल थेट अफगाणिस्तानला पाठवणे शक्य होणार आहे. सध्या भारताला अफगाणिस्ताशी व्यापार करायचा असेल तर पाकिस्तानच्या ग्वादार बंदरावरुन जावे लागते. मात्र दोन्ही देशांमधील तणापूर्ण संबंध पाहता चाबहार बंदर भारतासाठी अत्यंत सुरक्षित आणि महत्त्वाचे आहे. यामुळे भारताला मध्य आशियाई देशांशी थेट व्यापार करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र यामुळे पाकिस्तान भू-राजकीय दृष्ट्या एकटा पडण्याची शक्यता आहे. याची भिती पाकिस्तानच्या मनात निर्माण झाली आहे.
दरम्यान यापूर्वी भारताने अफगाणिस्तानशी देखील चर्चा केली आहे. भारत आणि अफगाणिस्तानमधील ही चर्चा पाकिस्तानच्या चिंतेत भर घालत आहे. १९९९ नंतर भारताशी तालिबानसोबत ही पहिलीट चर्चा होती.