Pakistan Army Chief General Munir's threatens tehrik e taliban Pakistan
इस्लामाबाद: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी 13 जानेवारी 20025 रोजी पेशावर येथे दौरा केला. यादरम्यान त्यांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ला उघडपणे धमकी दिली आहे. जनरल मुनीर यांनी म्हटले, “देशात शांतता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न प्रखर शक्तीने चिरडून टाकला जाईल.” त्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचा निर्धार स्पष्ट झाला.
TTP च्या हल्ल्यांचा वाढता धोका
गेल्या काही वर्षांपासून TTP ने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. या हल्ल्यामुळए पाकिस्तान नागरिकांनी आणि सैन्याला मोठे नुकसाने झेलावे लागलेस. 2024 हे वर्ष पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहे. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये पाकिस्तानमध्ये एकूण 444 दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 685 सुरक्षा जवानांनी आपला जीव गमावला.
याशिवाय 2,546 नागरिकांचा मृत्यू झाला असून 2,267 जण जखमी झाले आहेत. विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान हे प्रदेश TTP च्या हिंसाचारामुळे अधिक प्रभावित झाले आहेत. खैबर पख्तूनख्वामध्ये 1,616 मृत्यू नोंदवले गेले, तर बलुचिस्तानमध्ये 782 जण मृत्यूमुखी पडले.
TTP विरोधातील कारवाई
पेशावरच्या दौऱ्यात जनरल असीम मुनीर यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील मुख्यमंत्री अली अमीन गंडापुर यांच्यासह विविध राजकीय नेत्यांशी देखील चर्चा केली. या बैठकीत त्यांनी TTPच्या कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, “दुश्मन कितीही कट रचत असला तरी पाकिस्तान त्याच्या इच्छाशक्तीपासून हटणार नाही. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यामुळे त्यांची नुकसान करण्याची क्षमताच नष्ट होईल.” पाकिस्तानी सरकार आणि सेना TTP ला “फितना अल-ख्वारिज” या नावाने संबोधतात. याविरोधात विशेष मोहीम राबवण्याची माहितीही त्यांनी दिली.
सैन्याची कठोर भूमिका
पाकिस्तानी सैन्याने देशातील शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली, देशातील दहशतवादाविरुद्ध प्रभावी पावले उचलण्यावर भर दिला जात आहे. टीटीपी सारख्या संघटनांच्या कारवायांमुळे पाकिस्तानमध्ये हिंसा आणि अस्थिरता वाढली आहे, मात्र पाकिस्तानची सैन्य यंत्रणा या संघटनांना संपवण्यासाठी संकल्पबद्ध आहे. पाकिस्तानी सैन्य आणि सरकारचा हा निर्धार देशातील वाढत्या दहशतवादाला आव्हान देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नायजेरियात 40 शेतकऱ्यांची अमानुष हत्या; ‘या’ दहशतवाद्यांनी केला कहर