Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan War: पाकिस्तानी सैन्य कामचुकार! तालिबानकडून हारून गेले ‘या’ मुस्लिम राष्ट्रांच्या पाया पडायला; केली युद्धबंदीची विनंती

Pakistan-Afghanistan War: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा वाद आता हिंसक लष्करी चकमकीत रूपांतरित झाला आहे. शुक्रवारी पहाटे दोन्ही बाजूंनी सीमेवर एकमेकांवर जोरदार बॉम्बहल्ला केला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 27, 2026 | 03:33 PM
pakistan army defeat taliban seeks mediation saudi arabia qatar durand line clash

pakistan army defeat taliban seeks mediation saudi arabia qatar durand line clash

Follow Us
Close
Follow Us:
  • तालिबानचा मोठा दणका
  • पाकिस्तानची सौदीकडे धाव
  • ऑपरेशन गजब लिल हक

Afghan Air Force strikes Pakistan military bases 2026 : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Pakistan Afghanistan war) सीमावाद आता केवळ वादापुरता मर्यादित न राहता एका भीषण युद्धाच्या खाईत लोटला गेला आहे. ड्युरंड रेषेवर (Durand Line) सुरू असलेल्या या संघर्षात पाकिस्तानी सैन्याला तालिबानकडून मोठा दणका बसला आहे. आपल्या १९ लष्करी चौक्या आणि डझनभर सैनिकांना गमावल्यानंतर आता पाकिस्तानने लष्करी सामर्थ्यापेक्षा राजनैतिक मार्गाने आपला बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी तणाव कमी करण्यासाठी तातडीने सौदी अरेबिया आणि कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधून “कसेही करून तालिबानला थांबवा” अशी विनवणी केली आहे.

तालिबानचा ‘लष्करी प्रहार’ आणि पाकिस्तानचे नुकसान

गेल्या ४८ तासांपासून सीमेवर तोफा धडाडत आहेत. अफगाण तालिबान सरकारने असा दावा केला आहे की, त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या १५ ते १९ चौक्या ताब्यात घेतल्या असून ५५ सैनिकांना यमसदनी धाडले आहे. तालिबानने अनेक व्हिडिओ जारी केले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याची शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करताना त्यांचे लढाऊ दिसत आहेत. या पराभवामुळे पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठेला मोठा तडा गेला असून सीमेवर त्यांचे नियंत्रण सुटल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pak-Afg War: ‘असीम मुनीर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणारा…’ सोशल मीडियावर जनतेकडून पाकिस्तानी लष्कराची खरडपट्टी

सौदी अरेबिया आणि कतारकडे ‘युद्धबंदी’साठी विनंती

तालिबानचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेल्या पाकिस्तानने आता इस्लामिक देशांकडे मदतीची हाक दिली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांना फोन केला. सूत्रांनुसार, पाकिस्तानने सौदीला विनंती केली आहे की त्यांनी अफगाण तालिबानवर दबाव आणून हे हल्ले थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी. यापूर्वीही सौदीच्या सांगण्यावरून तालिबानने काही पाकिस्तानी सैनिकांना सोडले होते, याच धर्तीवर आता पुन्हा एकदा पाकिस्तान सौदीच्या पाया पडला आहे. कतार आणि ओमानकडेही पाकिस्तानने याच आशेने संपर्क साधला आहे.

Pakistan and Afghanistan forces mobilise near border locations amid clashes, as countries around the world urge both parties to show restraint. 🔴 LIVE updates: https://t.co/S62fnNuB41 pic.twitter.com/HkABjpv6uq — Al Jazeera English (@AJEnglish) February 27, 2026

credit – social media and Twitter

‘ऑपरेशन गजब लिल हक’ आणि पाकिस्तानचा पलटवार

आपल्यावरील टीका टाळण्यासाठी पाकिस्तानने या लष्करी कारवाईला “ऑपरेशन गजब लिल हक” (Operation Gazab Lil Haq) असे नाव दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, त्यांच्या हवाई दलाने काबूल, पक्तिया आणि कंधारमधील तालिबानच्या अड्ड्यांना लक्ष्य केले आहे. या हवाई हल्ल्यात १३३ तालिबानी सैनिक मारले गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, तालिबानने हा दावा फेटाळून लावत पाकिस्तान केवळ नागरी वस्त्यांवर बॉम्बफेक करत असल्याचा आरोप केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: आता उघड युद्ध होईल! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ तालिबानवर डाफरले; भारताचं नाव घेत ओकली विषारी गरळ

ड्युरंड रेषेवर ‘आरपार’ची लढाई

पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये झालेल्या अलीकडील संरक्षण कराराचा हवाला देत पाकिस्तान आता या युद्धाला आंतरराष्ट्रीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. या करारांतर्गत ‘पाकिस्तानवर झालेला हल्ला हा सौदीवरील हल्ला मानला जाईल’ असे नमूद आहे. मात्र, तालिबानने ड्युरंड रेषा ही अधिकृत सीमा मानण्यास नकार दिला असून, ही लढाई आता केवळ सीमेपुरती मर्यादित न राहता अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा बनली आहे. भारतानेही पाकिस्तानच्या हवाई सीमा उल्लंघनावर टीका केल्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या कोणत्या शहरांना लक्ष्य केले?

    Ans: अफगाण हवाई दलाने इस्लामाबादजवळील फैसलाबाद, नौशेरा, जमरुद आणि अबोटाबादमधील प्रमुख लष्करी तळांना आणि वसाहतींना लक्ष्य केले आहे.

  • Que: अफगाणिस्तानने हा हल्ला का केला?

    Ans: पाकिस्तानने आदल्या रात्री काबूल, कंधार आणि पक्तिका या अफगाण शहरांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर (Retaliation) म्हणून ही कारवाई करण्यात आली.

  • Que: या हल्ल्यात किती नुकसान झाले आहे?

    Ans: अफगाण संरक्षण मंत्रालयाने ही कारवाई यशस्वी झाल्याचा दावा केला असून पाकिस्तानची लष्करी प्रतिष्ठाने उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. मात्र, अधिकृत जीवितहानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.

Web Title: Pakistan army defeat taliban seeks mediation saudi arabia qatar durand line clash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack
  • Afghanistan-Pakistan Conflict
  • World War 3

संबंधित बातम्या

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान
1

World War 3 : विनाशकारी युद्धाने इराण 12 वर्षे गेला मागे; ४० दिवसांच्या युद्धात २७० अब्ज डॉलर्सचे नुकसान

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ
2

Strait of Hormuz: “जवळ आलात तर थेट उडवून देऊ..”; होर्मुजच्या नाकेबंदीवर ट्रम्प यांचा इराणला सर्वात मोठा इशारा; तेहरानमध्ये खळबळ

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट
3

नेतान्याहूंचा ‘हुकमी एक्का’ की Israelच्या विनाशाची नांदी? Roman Gofman यांच्या नियुक्तीवरून लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेत उभी फूट

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?
4

US-Iran Conflict : ‘करार होणारच होता… पण’, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले सत्य; शस्त्रसंधी संपणार, मिसाईल्स बरसणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.