
pakistan defense minister khawaja asif two front challenge afghanistan india
India-Pakistan tensions : पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध( India) उघडपणे आरोपांची मालिका केली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान ( Afghanistan-Pakistan) संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेल्या संवेदनशील काळात केलेले त्यांचे हे विधान संपूर्ण दक्षिण आशियात नवी चर्चा निर्माण करत आहे. आसिफ यांनी दावा केला की अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानवर होणाऱ्या हल्ल्यांमागे भारताचा हात आहे. त्यांच्या मते, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्ष पेटला तर भारतलादेखील त्याचा फायदा होईल.
पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की इस्लामाबाद दोन आघाड्यांवर युद्धाच्या परिस्थितीत अडकू शकते. भारत आणि अफगाणिस्तान या दोन दिशांनी पाकिस्तानवर दबाव वाढत असून भारताच्या भूमिका व विधानांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे, असे त्यांनी म्हटले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
आसिफ यांनी असा दावा केला की पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या सीमापार घुसखोरीवर सौदी अरेबिया, यूएई, इराण आणि चीनसारख्या महत्त्वाच्या देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव मागील काही महिन्यांत वाढत चालला आहे. गेल्या महिन्यात दोन्ही देशांच्या सैन्यात मोठी चकमक झाली होती, ज्यात दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी सहन करावी लागली. परिस्थिती इतकी बिघडली की, तुर्की आणि कतारच्या मध्यस्थीने १९ ऑक्टोबरला युद्धबंदी जाहीर करावी लागली.
तथापि, या वादात भारताला ओढण्याचा प्रयत्न आसिफ यांनी पुन्हा केला, आणि याचा अर्थ पाकिस्तान भारताच्या वाढत्या सामर्थ्याने घाबरलेला आहे, असे स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः त्यांनी भारतीय लष्करप्रमुखांच्या विधानांचा उल्लेख करून भारताची वाढती क्षमता पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकते, असे संकेत दिले.
नवी दिल्लीतील चाणक्य संरक्षण संवाद कार्यक्रमात बोलताना भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला. त्यांनी ठामपणे म्हटले की भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला पूर्णपणे तयार आहे आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना योग्य उत्तर देण्यात भारत कधीही मागे राहणार नाही. जनरल द्विवेदी यांनी “ऑपरेशन सिंदूर हे फक्त ट्रेलर होते, जे 88 तासांत संपले” असे म्हटल्याने पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ भारत-पाकिस्तान तणावाशी जोडत, पाकिस्तानविरुद्धच्या भावी कारवाईचे संकेत असल्याचे विश्लेषक मानत आहेत. ते पुढे म्हणाले की, “पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही; चर्चा आणि दहशतवाद एकत्र राहू शकत नाही.” हे पाकिस्तानला स्पष्ट संदेश होते की भारत आता निर्णायक पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास
अफगाण तालिबानने अद्याप पाकिस्तानच्या दाव्यांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ते नेहमीच सांगतात की अफगाणिस्तानची भूमी कोणत्याही देशाविरुद्ध वापरू देणार नाही. परंतु पाकिस्तानचे दावे, त्यांची भीती आणि वाढते आरोप या सर्वांमधून भारतीय लष्कराची वाढती ताकद पाकिस्तानला खरा धोका वाटत असल्याचे संकेत मिळतात.
Ans: पाकिस्तानचा दावा आहे की भारत अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानविरुद्ध हल्ले घडवून आणतो.
Ans: जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की भारत कोणत्याही युद्धासाठी पूर्ण तयार आहे आणि “ऑपरेशन सिंदूर हे फक्त ट्रेलर होते.
Ans: सीमापार हल्ले, चकमकी, आणि दोन्ही देशांतील वाढते अविश्वास यामुळे तणाव शिगेला पोहोचला आहे.