अफगाणिस्तान टीम(फोटो-सोशल मीडिया)
AFG vs PAK: 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत असियातील मातब्बर संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारतीय संघ 10 सप्टेंबरपासून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. त्याआधीच भारताला आव्हान देणाऱ्या टीमने दंड थोपटले आहेत. आशिया कपपूर्वी, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात T20 स्वरूपाची त्रिकोणी मालिका खेळली जात आहे. या मालिकेत अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले आहे. या विजयाने अफगणिस्तान संघाने भारताला जणू इशारचा दिसला आहे. भारताला आता अफगाणिस्तान संघापासून सावधान राहावे लागणार आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवला विक्रम रचण्याची नामी संधी! ‘या’ खेळाडूंना देणार धोबीपछाड
अफगाणिस्तान संघ आशिया कपमध्ये गेम चेंजर ठरू शकतो. हा संघ नेहमी धोकादायक ठरत आला आहे. अफगाणिस्तानच्या अलीकडील कामगिरीकडे पाहून तो संघ आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करू शकतो हे दिसून येत आहे. आशिया कपपूर्वी खेळवण्यात येत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि UAE यांच्यातील T20 तिरंगी मालिकेत अफगाणिस्तानने मंगळवारी पाकिस्तानला धक्का दिला आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सर्वांनाच वाटले होते की पाकिस्तान येथे देखील अफगाणिस्तानला पराभूत करेल, परंतु सर्वांचे अंदाज फसले आणि या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला १८ धावांनी धूळ चारली. या सामन्यानंतर रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाने आशिया कपपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेशसह भारताला देखील एक कडक इशारा दिल्याचे मानले जात आहे.
अफगाणिस्तान संघाने जागतिक क्रिकेटमध्ये मोठ मोठे पराक्रम केले आहेत. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला २१ धावांनी पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हा त्यांच्यासाठी क्रिकेट इतिहासातील सर्वात संस्मरणीय विजयांपैकी एक ठरला आहे. या काळात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला देखील धूळ चारली होती. तसेच २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात, अफगाणिस्तान संघाने श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडलाही पराभूत करण्याची किमया साधली होती. अलीकडेच, २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा इंग्लंड संघाला धोबी पछाड देऊन आपली क्रिकेट क्षमता दाखवून दिली.
हेही वाचा : ‘तेव्हा धोनी मला शिवीगाळ करतच राहिला..’, CSK च्या माजी वेगवान गोलंदाजाचा खळबळजनक खुलासा..
२०२५ च्या आशिया कपमध्ये टीम इंडिया अ गटामध्ये आहे, तर टीम अफगाणिस्तान ब गटात आहे. अशा परिस्थितीत ग्रुप स्टेजमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार नाही. परंतु क्वालिफायर राउंडमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात दमदार कामगिरी करावी लागणार आहे.