Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

Imran Khan: तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मुलांनी शहबाज सरकारवर गंभीर आरोप केले असून, आपल्या वडिलांना ठार मारण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 28, 2026 | 11:29 AM
Imran Khan च्या मुलांनी पाकिस्तान सरकारवर आरोप (फोटो सौजन्य - Social Media)

Imran Khan च्या मुलांनी पाकिस्तान सरकारवर आरोप (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानातील शहबाज सरकारवर इमरान खानच्या मुलांचे गंभीर आरोप
  • वडिलांना मारून टाकण्याचा सरकारच प्रयत्न असल्याचे सांगितले
  • गेल्या काही महिन्यांपासून इमरान खान तुरुंगात 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार Imran Khan यांचे पुत्र कासिम आणि सुलेमान खान यांनी पाकिस्तानी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की, सरकार तुरुंगात असलेल्या त्यांच्या वडिलांना ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे. इमरान खाने गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात तुरुंगात आहे. 

‘द टेलिग्राफ’मधील एका वृत्तानुसार, इम्रान खान यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या सुरक्षेबद्दल आणि तुरुंगातील वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, पाकिस्तानी सरकारकडून त्यांच्या वडिलांना दिली जाणारी वागणूक त्यांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. तसंच त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्या मुलांनी केला आहे. 

Imran Khan News : गावसकर-कपिल देव इम्रान खानच्या समर्थनार्थ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र

कासिम आणि सुलेमान हे जेमिमा गोल्डस्मिथ यांचे मुलगे 

७३ वर्षीय इम्रान खान गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर त्यांच्यावर अनेक कायदेशीर खटले दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते विविध आरोपांखाली तुरुंगात आहेत. इम्रान खान यांचे पुत्र, कासिम आणि सुलेमान, हे त्यांच्या माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांचे पुत्र आहेत. या दोघांनीही पाकिस्तानातील त्यांच्या वडिलांच्या स्थितीबद्दल आणि सुरक्षेबद्दल बऱ्याच काळापासून चिंता व्यक्त केली आहे.

ताज्या आरोपांमुळे इम्रान खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अहवालात पाकिस्तान आणि क्रिकेट यांच्यात इम्रान खान यांच्यावरून सुरू असलेल्या वादाचाही उल्लेख आहे. इम्रान खान हे पाकिस्तानी क्रिकेटमधील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने १९९२ चा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

Imran Khan: पाकिस्तानच्या राजकारणात नवी ‘डील’? इम्रान खान काढणार शाहबाज शरीफ यांचा काटा; नक्वींना दिला दिलासा

PTI चा राजकीय सूड

पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यापासून इम्रान खान यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे समर्थक आणि पक्ष, पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय), यांचा दावा आहे की त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. दरम्यान, पाकिस्तानी सरकारने या खटल्यांना सातत्याने कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे.

इम्रान खान यांच्या मुलांनी केलेले हे ताजे आरोप अशा वेळी आले आहेत, जेव्हा त्यांच्या वडिलांच्या दीर्घकाळच्या तुरुंगवासाबद्दल आणि त्यांच्या आरोग्य व सुरक्षेबद्दल चिंता कायम आहे. त्यांच्या आरोपांमुळे पाकिस्तानी सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव पुन्हा वाढला आहे. दरम्यान गेल्या तीन वर्षांपासून इम्रान खान तुरुंगात बंद आहे. 

Web Title: Pakistan ex pm imran khan in jail sons allege shehbaz government attempting assassinate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Imran khan
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस
1

Japan News : झोपेचीही स्पर्धा! जपानमध्ये रंगली ‘सर्वोत्तम विश्रांती’ घेण्याची अनोखी चुरस

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट
2

World Economy : युद्ध, महागाई आणि कर्जाचा तिहेरी फटका; विकसनशील देशांसमोर मोठे संकट

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू; शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान संघर्षात नवी ठिणगी
3

Pakistan Emergency: पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू; शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान संघर्षात नवी ठिणगी

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी
4

Strait Of Hormuz : ओमानच्या आखातात अमेरिकेचा मोठा हवाई हल्ला: ‘ओशन मोलिका’ मालवाहू जहाज समुद्रातच निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.