Pakistan Foreign minister Ishaq Dar on India Pakistan war Donald trump
Pakistan Minister on Operation Sindoor : इस्लामाबाद : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांचे एक खळबळजनक विधान समोर आले आहे. दार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडघशी पाडले असून भारत पाकिस्तान युद्धबंदीमध्ये तिसऱ्या देशाचा प्रस्ताव नाकारला आहे. मंत्री इशाक दार यांनी अलजजीराला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान आणि भारतमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. पण भारताने यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट नकार दिला होता.
दार यांच्या विधानाने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, मात्र यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलाच धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले होते. या मोहिमेद्वारे भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तान चवथाळला होता. त्याने भारतावर हवाई हल्ले सुरु केले होते. मात्र भारताने प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. पण परिस्थिती बिघडत चालली होती. दोन्ही देश अणु युद्धाच्या दिशने वाटचाल करत होते. यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती.
भारत अन् अमेरिकेमधील नाराजी होणार दूर? मात्र चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना ‘टॅरिफचा तोरा कायम’
यावेळी अनेक जागतिक नेत्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा आणि शांततेने चर्चा करण्याचा सल्ला गिला होता. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील दोन्ही देशांशी चर्चा केली होती. पाकिस्तानलाही दबाव जाणवू लागला. दरम्यान पाकिस्तानने भारताच्या DGMO शी चर्चा करुन युद्धविरामाची विनंती केली होती. परंतु दोन्ही देशात युद्धविराम होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर युद्धविराम झाल्याची पोस्ट केली.
ट्रम्प यांनी १० मे रोजी त्यांच्या ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्याची घोषणा केली. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. यावेळी पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचे आभारही मानले. पण भारताने भारत पाकिस्तान वादात तिसऱ्या देशाचा सहभाग नाकारला होता. पण आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल केली असून भारताची बाजू अधिक ठोस ठरली आहे. ट्रम्प यांनी अनेक वेळा युद्धबंदीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. पण भारताने प्रत्येकवेळी नकार देत केवळ दोन्ही देशातील द्विपक्षीय चर्चेमुळे युद्धबंदी झाल्याचे स्पष्ट केले होते.
THERE WAS NO 3RD PARTY MEDIATION.
Rahul Gandhi, listen carefully → Pakistan’s own Foreign Minister Ishaq Dar told Al-Jazeera that India categorically rejected any third-party ceasefire mediation.
Stop peddling lies. Stop echoing Pakistan’s propaganda. pic.twitter.com/ib3ccDjch0
— Amit Malviya (@amitmalviya) September 16, 2025
भारत आणि पाकिस्तानमध्ये का सुरु होते युद्ध?
२२ एप्रिल रोजी भारताच्या जम्मु-काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ नागरिक ठार झाले होते. यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबादार धरले होते. यामुळे दोन्ही देशात तीव्र युद्ध सुरु झाले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धबंदीवर काय दावा केला होता?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १० मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केल होता.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी युद्धबंदीवर काय सांगितले?
आजपर्यंत पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्ध झाल्याचे सांगत आला होता. याला भारताने स्पष्ट नकार दिला होता. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलजजीराच्या मुलाखतीदरम्यान भारताने-पाकिस्तान युद्धात अमेरिकेची मध्यस्थीन नव्हती, भारताने ट्रम्प यांचा प्रस्ताव नकारला होता असे सांगितले.