भारत अन् अमेरिकेमधील नाराजी होणार दूर? मात्र चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना 'टॅरिफचा तोरा कायम'(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Peter Navarro on India US Trade Talk : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे व्यापार सल्लागारी पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतवर मोठे विधान केले आहे. नवारो यांनी पुन्हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापार चर्चेवर आणि भारतावर लादलेल्या करावर आपले मत माडंले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले आहे. तसेच एका मुलाखतीदरम्यान नावारो यांनी म्हटले की, भारत व्यापार चर्चेचा अंतिम टप्प्यावर आला आहे. सध्या दोन्ही देशात व्यापारातील अडथळे दूर करण्यावर चर्चा सुरु आहे. पण त्यांनी भारत रशिया तेल व्यापारावर आणि भारत चीन संबंधावर टीका केली आहे.
अमेरिकन सैन्याचा व्हेनेजुएलाच्या ड्रग्ज कार्टेलवर हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता आदेश
नवारो यांनी म्हटले की, भारत व्यापार संवादाच्या अंतिम टप्प्यावर आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैत्रीपूर्ण, चांगले आणि सकारात्मक ट्विट केले. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्याला तसेच उत्तर दिले. आता दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण पाऊल कसे कार्य करते हे आपण पाहूयात, असे त्यांनी म्हटले.
नवारो यांनी पुढे म्हटले की, भारताने व्यापारातील अडथळे दूर करण्यासाठी चर्चा सुरु केली असली तरी, भारत हा टॅरिफचा महाराजा आहे. व्यावहारिक दृष्ट्या भारत पुढे असला तरी त्यांच्या इतर देशांवरील जास्त शुल्कामुळे खूप अडथळे येतात असे त्यांनी म्हटले.
“India is coming to the table”: White House Trade Advisor Peter Navarro
Read @ANI Story | https://t.co/6YMxQzWcSX#US #trade #PeterNavarro #Tariffs pic.twitter.com/McnXIZ13jd
— ANI Digital (@ani_digital) September 15, 2025
नवारो यांनी भारत आणि रशियन तेल खरेदीवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी २०२२ पूर्वी कधी तेल खरेदी केली नव्हती, पण रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर भारत आणि रशियामध्ये मोठ्या प्रमाणात तेल व्यापार सुरु झाला. भारताला जास्त स्वस्त दरात तेल मिळू लागले, पण याचा सर्वाधिक तोटा युक्रेनला रशियाच्या हल्ल्यामुळे झाला.
कारण यातून मिळालेल्या पैशातून रशिया मोठ्या प्रमाणाच शस्त्र खरेदी करत आहे आणि युक्रेनवर हल्ल्यासाठी त्याचा वापार करत आहे. याच वेळी नवार यांनी भारत आणि चीन संबंधावर देखील टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, चीन आणि भारताचे एकत्र येणे हे युक्रेनसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग