Imran Khan makes serious allegations on Asim Munir of targeting wife and Sister
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले आहे. इम्रान खान यांनी असीम मुनीर त्यांच्या घरातील महिलाना लक्ष्य करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इम्रान खान यांच्या म्हणण्यानुसार, असीम मुनीर त्यांच्या घरातील महिलांना जाणूनबुजून लक्ष करत आहेत. त्यांच्याशी गैरवर्तणूक केले जात आहे.
संयुक्त राष्ट्रात तक्रार दाखल
याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान आणि त्यांचा मुलगा सुलेमान व कासिम यांनी त्यांच्या वडिलांच्या वतीने एक अर्ज सादर केला आहे. हा अर्ज इम्रान खान यांच्या पीटीआय संस्थेने संयुक्त राष्ट्राच्या स्पेशल रॅपोर्टेयर ऑन टॉर्चर डॉ. अलिस जे. एडवर्ड्स यांच्याकडे सादर केला आहे. तसेच इम्रान खान यांनी त्यांची बहिण मरियम वट्टू यांनाही त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. खान यांनी बहिण आणि बुशरा बीबीसाठी संयुक्त राष्ट्रात खटला दाखल केला आहे.
पीटीआय संस्थेचे आरोप
इमरान खान व बुशरा बीबी यांच्या कायदेशीर पथकाने संयुक्त राष्ट्रांच्या “स्पेशल रॅपोर्टेयर ऑन टॉर्चर” डॉ. ॲलिस जे. एडवर्ड्स यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पीटीआयचे नेते सैयद जुल्फिकार यांनी एक्स (माजी ट्विटर)वर माहिती दिली की इमरान खान यांचे पुत्र सुलेमान व कासिम यांनी आपल्या वडिलांच्या वतीने अर्ज सादर केला आहे, तर मरियम वट्टू यांनी आपल्या बहिणी बुशरा बीबीसाठी अपील केले आहे. पीटीआयचे नेते सैय्यद झुल्फिकार यांनी सोशल मीडियावरुन याची माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या इतिहासामध्ये प्रथमच राजकीय कैद्याच्या घरातील महिलांना त्रास दिला जात आहे. त्यांचे मनोबल कमी केले जात आहे. यासाठी इम्रान खान यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात बुशरा बीबीवर अंडाफेक करण्यात आला होता. यानंतर इम्रान खान यांनी ही तक्रार दाखल केली आहे. सैय्यद झुल्फिकार यांनी सध्या संपूर्ण देश इम्रान खान यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे. यामुळे ते मागे हटणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
इम्रान खान यांचा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी आणि पाकिस्तानच्या फर्स्ट लेडी बुशरा बीबी यांच्यावर राजकीय हेतूने आरोप लावून त्याना सात वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा दिली गेली असल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले आहे. २०२४ पासून बुशरा बीबीब नजरकैदेत आहेत. त्यांच्यासोबत अमानुष वर्तन केले जात असल्याचे त्यांच्या कुटुंबाने म्हटले आहे.
आरोप करण्यात आला आहे की, बुशरा बीबीला अन्ना असिड मिसळून देण्याचा, अस्वच्छ कोठीत ठेवण्याचा वैद्यकीय उपतार न देण्याचा आणि दीर्घ काळ एकांतवासात ठेवण्याच्या पद्धतीने छळ करण्यात आला आहे. या कारवाया करुन इम्रान खान यांना मानिसक त्रास दिला जात असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.तसेच इम्रान खान यांच्या कुटुंबाचे वकिल जेरेड जेनसर यांनी, संयुक्त राष्ट्राला आणि जागतिक समुदायांना हस्तक्षेप करण्याची आणि इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
इम्रान खान यांनी कोणावर आणि काय आरोप केले आहेत?
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांसोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे.
पीटीआयने संयुक्त राष्ट्राकडे काय अपील केली?
पीटीआयने संयुक्त राष्ट्राकडे इम्रान खान आणि बुशरा बीबीच्या छळाच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे.
अवघं २२ वर्षे वय, अन्…, चार्ली कर्कच्या खुनातील संशयित आरोपी टायलरला अटक; अनेक नवे खुलासे!