पाकिस्तान सरकारचा मोठा निर्णय; माजी पंतप्रधान इम्रान खानच्या PTI पक्षावर घालणार बंदी
नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तहरीक-ए-इन्साफ (PTI) या इम्रान खानच्या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. इम्रान खानच्या गैरव्यवहारामुळे त्यांच्या पक्षावर बंदी घालण्यात येणार आहे. त्यांच्यावर दंगली भडकवणे, लाच घेण्याचे आरोप करण्यात आले असून त्यांना तुरूंगात ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी सतत वाढत होत्या. त्यांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणुका लढवण्यासाठीही परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच त्यांच्या समर्थकांनी अपक्ष निवडणुका लढून जागा जिंकल्या. परंतु इतर पक्षांच्या एकजुटीमुळे इम्रान खान यांचे सरकार स्थापन झाले नाही. आता पाकिस्तान सरकारने त्यांच्या पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालणार असल्याची माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितले आहे. मंत्री अताउल्लाह तरार म्हणाले की, पीटीआयच्या देशविरोधी कारवायांमुळे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खानने आपल्या राजकीय इच्छांसाठी देशाचे राजनैतिक संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यावर लाच घेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 9 मे च्या इम्रान खान यांच्यावर दंगलीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. इतरही अनेक प्रकरणे आहेत ज्यात ते दोषी आहे. हे सर्व पुरावे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Pak government moves to ban Imran Khan’s party, Tehreek-e-Insaaf says govt is daydreaming
Read @ANI Story | https://t.co/ngZcOzafIp#Pakistan #ImranKhan #PakistanGovernment #TehreekeInsaaf pic.twitter.com/4APKUGm09W
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2024
माजी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या विरोधात कलम 6 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा पाकिस्तानने निर्णय घेतला असल्याही माहिती समोर आली आहे. परवेझ मुशर्रफ यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री अताउल्लाह यांनी सांगितले आहे.