Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन सिंदूर’ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली; २३ जानेवारीपर्यंत बंदी कायम

Pakistan Airspace Ban: 'ऑपरेशन सिंदूर'च्या धसक्याने पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द २३ जानेवारी २०२६ पर्यंत बंद ठेवली आहे. भारतानेही पाकिस्तानी विमानांना 'नो एन्ट्री' देऊन चोख प्रत्युत्तर दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 17, 2025 | 09:56 PM
'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली (Photo Credit - X)

'ऑपरेशन सिंदूर'ची धास्ती! पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी हवाई हद्द पुन्हा रोखली (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • भारताच्या भीतीने पाकिस्तानने हवाई दार बंद!
  • २३ जानेवारीपर्यंत एअरस्पेसवर बंदी कायम
  • बंदीचा नेमका स्वरूप काय?
Pakistan Airspace Ban Marathi News: ‘ऑपरेशन सिंदूर‘नंतर पाकिस्तानची अस्वस्थता अजूनही कायम आहे. भारताने केलेल्या कारवाईचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानने भारतीय विमानांवरील एअरस्पेस (हवाई हद्द) बंदीचा कालावधी पुन्हा एकदा वाढवला आहे. आता २३ जानेवारी २०२६ पर्यंत भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हद्दीतून उड्डाण करता येणार नाही.

‘ऑपरेशन सिंदूर’चा परिणाम

पाच महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सुरक्षा दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळ आणि लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले, मात्र भारताला प्रत्युत्तर देण्यात पाकिस्तान अपयशी ठरला. याच वैफल्यातून पाकिस्तानने हवाई बंदीचा निर्णय घेतला आहे.

बंदीचा नेमका स्वरूप काय?

ही बंदी मूळतः २४ डिसेंबर रोजी संपणार होती, परंतु पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (पीएए) मुदतवाढ जाहीर केली. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय विमान कंपन्यांच्या मालकीची, चालवलेली किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली सर्व भारतीय नोंदणीकृत विमाने पाकिस्तानी हवाई क्षेत्रात उड्डाण करू शकणार नाहीत. ही बंदी भारतीय लष्करी विमानांना देखील लागू होईल.

The prolonged closure has significantly affected flight operations. Around 800 weekly flights operated by Indian airlines have been impacted. Read more: https://t.co/1elGtKvu80#Pakistanairspace pic.twitter.com/Df1ow8HUHY — Scroll.in (@scroll_in) December 17, 2025

हे देखील वाचा: Pakistan Financial Crisis: कर्जाच्या बोजाखाली दबला पाकिस्तान; २० महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ अब्ज रुपयांचे घेतले कर्ज 

पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या २०२२ च्या अहवालानुसार, पाकिस्तानचे हवाई क्षेत्र कराची आणि लाहोर या दोन उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहे. जारी केलेल्या NOTAM (विमानचालकांना सूचना) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ही बंदी या दोन एफआयआर क्षेत्रांना लागू होईल आणि २३ जानेवारी २०२६ पर्यंत लागू राहील.

भारताचे जशास तसे उत्तर

एप्रिलमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने पहिल्यांदा ही बंदी घातली होती. त्याला उत्तर म्हणून भारतानेही पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. दोन्ही देशांमधील या तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून विमानांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळेचा खर्च वाढला आहे.

तणावपूर्ण द्विपक्षीय संबंध

पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर मे महिन्यात दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला होता. तेव्हापासून पाकिस्तान वारंवार या बंदीचा कालावधी वाढवत आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानची ही कृती केवळ सुरक्षा चिंता नसून भारताच्या वाढत्या लष्करी दबावामुळे निर्माण झालेली भीती आहे.

हे देखील वाचा: ‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल

Web Title: Pakistan has again closed its airspace for indian aircraft the ban remains in effect until january 23

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 09:56 PM

Topics:  

  • Airlines
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

भारत अन् इराणच्या व्यापारला मिळणार नवी गती! चाबहार बंदराचे पुतीनकडून तोंडभरुन कौतुक
1

भारत अन् इराणच्या व्यापारला मिळणार नवी गती! चाबहार बंदराचे पुतीनकडून तोंडभरुन कौतुक

पाकिस्तानचा माज काही उतरेना! खिसा रिकामा झाला तरी भारतीय विमानांच्या उड्डाणावर घातली बंदी
2

पाकिस्तानचा माज काही उतरेना! खिसा रिकामा झाला तरी भारतीय विमानांच्या उड्डाणावर घातली बंदी

भारतविरोधी व्यक्तव्यांवर परराष्ट्र मंत्रालय आक्रमक; बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावून केला निषेध
3

भारतविरोधी व्यक्तव्यांवर परराष्ट्र मंत्रालय आक्रमक; बांगलादेश उच्चायुक्तांना बोलावून केला निषेध

इथिओपिया संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण; दहशतवादावर केले एकजुटीचे आवाहन
4

इथिओपिया संसदेत पंतप्रधान मोदींचे भाषण; दहशतवादावर केले एकजुटीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.