
Global Politics
अमेरिकेच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात इराण-अमेरिका संघर्ष (US Iran Conflict) शिगेला पोहोचला असाताना इराणने आपली काही लष्करी विमाने पाकिस्तानला सोपवली होती. ही लष्करी विमाने पाकिस्तानच्या हवाई तळ नूर-ए-खान तळांवर तैनात करण्यात आली. अमेरिकन हल्ल्यांपासून संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानने गुप्तपणे ही मदत केली असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणची शत्रूवर पाळत ठेवणारी लढाऊ विमानांना आश्रय देण्यात आला आहे.
मात्र या वादावर अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी संताप व्यक्त करण्यातऐवजी शांत भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान एक विश्वासार्ह मध्यस्थ असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर खूप चांगले काम करत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानवर ट्रम्प यांनी पूर्ण विश्वास दर्शवला आहे.
मात्र ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांना यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जेष्ठ खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानला मध्यस्थीच्या भूमिकेतून हटवण्याची मागणी केली आहे. ज्या देशाने इराणच्या लष्करी मालमत्तेला संरक्षण दिले त्यांच्या विश्वास ठेवता येणार नाही असे त्यांनी म्हटले.
दरम्यान पाकिस्तानने इराणला मदतीचे आरोप फेटाळले आहेत. नूर खान एअरबेस शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी गुप्तपणे विमाने तैनात करणे अशक्य असल्याचे पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले.
दरम्यान इराणने या दाव्यानंतर आपली लढाऊ विमाने अफगाणिस्तानमध्ये हलवली असल्याचा दावाही केला जात आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून शांतता चर्चा फिस्कटली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
If this reporting is accurate, it would require a complete reevaluation of the role Pakistan is playing as mediator between Iran, the United States and other parties. Given some of the prior statements by Pakistani defense officials towards Israel, I would not be shocked if… https://t.co/OqJ1cdVLFX — Lindsey Graham (@LindseyGrahamSC) May 11, 2026
Ans: अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, एप्रिल २०२६ मध्ये अमेरिका-इराण संघर्ष पेटलेला होता. यावेळी पाकिस्तानने इराणच्या लष्करी विमानांना आपल्या नूर खान एअरबेसवर आश्रय दिला होता. अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यांपासून इराणची विमाने वाचवण्यासाठी ही मदत केल्याचा दावा केला जात आहे.
Ans: ट्रम्प यांनी पाकिस्तानचे समर्थन केले आहे. त्यांनी पाकिस्तानला एक विश्वासार्ह मध्यस्थ म्हटले असून शाहबजा शरीफ आणि मुनीर यांचे कौतुक केले आहे.
Ans: लिंडसे ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिका इराण वादात मध्यस्थी म्हणून हटवण्याची मागणी केली आहे.
Ans: पाकिस्तानने इराणच्या विमानांना आश्रय दिल्याचा दावा फेटाळला आहे. नूर खान एअरबेस शहराच्या मध्यभागी असून या ठिकाणी विमाने लपवून ठेवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.