Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घाबरलेला पाकिस्तान दडला चीनच्या पंखाखाली; लष्करात वाढ करण्यासाठी ड्रॅगनकडून केली शस्त्र खरेदी

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला दिसत आहे. पाकिस्तानने आपली लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पाकिस्तानने चीनकडे धाव घेतली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2025 | 12:05 PM
Pakistan in fear after Operation Sindoor, gets J-35A fighter jets from China

Pakistan in fear after Operation Sindoor, gets J-35A fighter jets from China

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला दिसत आहे. पाकिस्तानने आपली लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पाकिस्तानने चीनकडे धाव घेतली आहे. पाकिस्तानने चीनकडून हवाई संरक्षण प्रणाली आणि लढाऊ विमांनाची खरेदी करण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने चीनचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट j-35A खरेदी केले आहे. पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनमधून या फायटर जेटचा पुरवठा लवकरच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान हवाई दलाचे वैमानित देखील या लढाऊ विमानासाठी प्रशिक्षण घेत आहेत.

PL-17 क्षेपणास्त्र देखील पाकिस्तानला मिळणार

J-35A विमानासोबत पाकिस्तानला चीनकडून हवेतून अचूक मारा करणारे PL-17 हे क्षेपणास्त्रे देखील पुरवले जाणार आहे. हे क्षेपणास्त्रे लढाऊ विमानत तैनात केले जाणार आहे. PL-17 ची मारा करण्याची क्षमता सुमारे ४०० किलोमीटर पर्यंत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये विशेषत: चीनी बनावटीची शस्त्रे उद्ध्वस्त झाली होती. यामुळे पाकिस्तानचा प्रचंड अपमान सहन करावा लागला होता. सध्या पाकिस्तान पुन्हा आपली लष्करी ताकद वाढवत आहेत.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- पाक लष्करावर पुन्हा घातपात; बलुच विद्रोह्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ सैनिक ठार

कधी मिळणार पाकिस्तानला लढाऊ विमाने? 

पाकिस्तान आणि चीननमध्ये ४० लढाऊ विमानांचा करार करण्यात आला आहे. चीनला डिसेंबर २०२४ मध्ये या J-35 लढाऊ विमानांची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डरची डिलिव्हरी २०२५ ऑगस्ट ते जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

J-35A ची वैशिष्ट्ये

J-35A ला शेनयांगा नावानेही ओळखले जाते. हे शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ने विकसित केले आहे. या लढाऊ विमानाच्या स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडार क्रॉस सेक्शन कमी होते. यामुळे रडारपासून बचाव करण्यास मदत मिळते. हे लढाऊ विमान मॅक २.० च्या वेगाने उडते.

चीनची नवी हवाई संरक्षण प्रणालीही खरेदी करणार पाकिस्तान

याशिवाय पाकिस्तान चीनची नवीन हवाई संरक्षण प्रणाली देखील खरेदी करण्याचा विचार करत आहे. पाकिस्तान HQ-19 ही क्षेपणास्त्र खरेदी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासोबतच्या तणावादरम्यान चीनकडून मिळालेली HQ-9 ही संरक्षण प्रणाली भारताच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत पूर्णत: नष्ट झाली होती. यामुळे पाकिस्तानने आता नवी प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे. शिवाय पाकिस्तानने आपल्या संरक्षण खर्चात देखील १८% ने वाढ केली आहे.

जागतिक घडामोडी संंबंधित बातम्या- घाबरलेल्या पाकची पुन्हा चीनकडे धाव, खरेदी करणार नवीन एअर डिफेन्स सिस्टीम; कशी आहे HQ-19?

Web Title: Pakistan in fear after operation sindoor gets j 35a fighter jets from china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
2

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
3

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी
4

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.