पाकिस्तान-इराणच आले एकत्र; नव्या रेल्वे मार्गेने जोडले जाणार दोन देश... भारताचं टेन्शन वाढणार?
Pakistan Iran Relations : तेहरान/इस्लामाबाद : सध्या इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीप यांची इस्लामाबादमध्ये भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांनी मैत्री मजबूत करण्याची घोषणा केली. तसेच पाकिस्तान (Pakistan) आणि इराणमधील (Iran) व्यापार, तंत्रज्ञान आणि वाहतूक क्षेत्रात संबंध वाढवण्यावर अनेक महत्वाचे करार करण्यात आले. मात्र इराण आणि पाकिस्तानमधील वाढते संबंध भारतासाठी धोक्याचे मानले जात आहेत.
या करारांतर्गत पाकिस्तान इराणमार्गे युरोप ते रशियापर्यंत मालवाहतूक करु शकणार आहे. ही वाहतूक इंटरनॅशनल नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर(INSTC) मार्गे केली जाणार आहे. याअंतर्गत भारताने चाबहार बंदर विकसित केले आहे. मात्र, पाकिस्तान आता हे बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला जोडणार आहे.
इस्लामाबाद-तेहरान-इस्तांबूल असा रेल्वे मार्ग तयार केला जाणार असून दोन्ही देशांमध्ये यावर सहमती दर्शवण्यात आली आहे. यामुळे आता पाकिस्तानच्या व्यापार वाहतूकीला वेग मिळणार आहे. समुद्री मार्गापेक्षा अधिक जलद गतीने पाकिस्तान मालवाहतूक करु शकणार आहे. हा मार्ग पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एक नवीन संधी निर्माण करत आहे. यामुळे भारताच्या व्यापर क्षेत्राला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
युक्रेन युद्धात भारत करत आहे रशियाची गुप्त मदत? डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा गंभीर आरोप
याच वेळी चीन (China) देखील या प्रकल्पामध्ये रस दाखवत आहे. INSTC प्रकल्पाला चीनने आपला CPEC म्हणजेच चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प जोडण्याचही विचार केला आहे. यामुळे चीनला मलक्का समुद्री मार्ग अवलंबवता येईल. या मार्गांवर भारत आणि अमेरिकेचा प्रभाव आहे. मात्र ही बाब अमेरिका आणि भारताच्या व्यापाराला धोका निर्माण करणारी आहे.
भारतासाठी पाकिस्तान-इराण आणि चीनची युती अत्यंत चिंताजनक आहे. चाबहार बंदरावर भारताने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प मध्य आशियाशी व्यापारासाठी जोडण्यात आला आहे. परंतु या तिन्ही देशांच्या भागीदारीमुळे भारताच्या चाबहार प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यत आहे. भारतासाठी धोरणात्मक आणि आर्थिक धोका वाढत आहे. शिवाय चीनची यामध्ये घुसखोरी भारतासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. यामुळे भारताची सुरक्षा धोक्यात आली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
काय आहे भारताचा चाबहार प्रकल्प?
चाबहार एक इराणमधील एक महत्वाचे बंदर आहे. हे बंदर भारताने विकसित केले असून याद्वारे अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत भारताला सहज आणि जल व्यापार करता येतो.
ग्वादर-चाबहार जोडल्यास भारताला काय धोका?
पंरतु चाबहार बंदर पाकिस्तानच्या ग्वादर बंदराला जोडले गेल्यास भारतासाठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या व्यापारावर आणि सागरी सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय यामध्ये चीनही रस दाखवत आहे.
चीन-पाकिस्तान-इराण एकत्र आल्यास काय होईल?
हे तिन्ही देश एकत्र आल्यास भारताच्या धोरणात्मक आणि आर्थिकतेला धक्का बसेल. यामुळे भारताचा चाबहार बंदरावरील प्रभाव कमी होईल. तसेच खाडी आणि मध्य आशियामध्ये देखील चीन भारताला धोका निर्माण करु शकतो.
Donald Trump : ट्रम्प धोक्यात? निषिद्ध क्षेत्रात घुसले विमान; अमेरिकन लष्कर हाय अलर्टवर