
Pakistan is acting on the UAE's behest Saudi Prince Salman is angry and shows Munir his place
Saudi UAE clash Yemen January 2026 : मध्य पूर्वेतील दोन शक्तिशाली देश सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि युएई (UAE) यांच्यातील शीतयुद्ध आता टोकाला पोहोचले असून, यामध्ये पाकिस्तानची अवस्था ‘दोन दगडांत पाय’ अशी झाली आहे. येमेनमधील अंतर्गत संघर्षावरून सौदी आणि युएईमध्ये संघर्ष सुरू असतानाच, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी पाकिस्तानी नेतृत्वाला मोठा धक्का दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रिन्स सलमान यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी येमेनच्या एडन (Aden) विमानतळावर एक खळबळजनक घटना घडली. युएई समर्थित दक्षिणी संक्रमणकालीन परिषद (STC) या गटाने सौदीच्या उच्च अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला उतरण्याची परवानगी नाकारली. सौदीने याला आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन म्हटले असून, युएईला येमेनमधून आपले सर्व सैन्य २४ तासांच्या आत मागे घेण्याचा इशारा दिला आहे. या तणावामुळे आखाती देशांमधील वातावरण कमालीचे तापले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
माजी लष्करी अधिकारी आदिल राजा यांनी केलेल्या दाव्यानुसार, असीम मुनीर सौदी राजपुत्राची नाराजी दूर करण्यासाठी तातडीने रियाधला जाण्याच्या तयारीत होते. मात्र, प्रिन्स सलमान यांनी त्यांना भेटीची वेळ देण्यास नकार दिला. याचे मुख्य कारण म्हणजे युएईच्या अध्यक्षांचा नुकताच झालेला पाकिस्तानचा खासगी दौरा. सौदीला डावलून पाकिस्तान युएईच्या अधिक जवळ जात असल्याचे चित्र निर्माण झाल्याने एमबीएस (MBS) कमालीचे संतप्त झाले आहेत.
The UAE Sheikh is the latest foreigner to land at Nur Khan Airbase since the BrahMos in May. He then attended Marshal’s daughter’s wedding and headed off to Rahim Yar for hunting & *ahem* The sheikh forced Pakistan to sell $1bn shares in Fauji group. Slavery or Diplomacy? pic.twitter.com/cDccE35v5c — Field Marshal Syed Asim Munir’s Ego (@JungjooGernail) December 27, 2025
credit : social media and Twitter
दुसरीकडे, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज सध्या दुबईमध्ये ठाण मांडून आहेत. शाहबाज शरीफ यांच्या जागी असीम मुनीर यांना अधिक ताकद देण्यासाठी ते युएईच्या नेतृत्वावर दबाव आणत असल्याचे बोलले जाते. मात्र, असीम मुनीर आता युएईच्या सांगण्यावरून बिलावल भुट्टो झरदारी यांना पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
या सर्व गोंधळात सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे सौदी राजपुत्रांची बदललेली भूमिका. एकेकाळी इम्रान खान यांच्यावर नाराज असलेले सौदी युवराज आता पाकिस्तानमधील अस्थिरता पाहता इम्रान खान (Imran Khan) यांची तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी आग्रही असल्याचे समजते. सौदीला वाटते की, केवळ इम्रान खानच पाकिस्तानला या आर्थिक आणि राजकीय संकटातून बाहेर काढू शकतात. पाकिस्तानने युएईचा शब्द मानला तर सौदीकडून मिळणारी आर्थिक मदत बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Ans: येमेनमधील दक्षिणी संक्रमणकालीन परिषद (STC) आणि विमानतळ नियंत्रणावरून तसेच प्रादेशिक वर्चस्वावरून दोन्ही देशांत तणाव आहे.
Ans: पाकिस्तानने सौदीला विश्वासात न घेता युएईच्या नेतृत्वाशी जवळीक साधल्यामुळे आणि येमेन वादात तटस्थ न राहिल्यामुळे एमबीएस नाराज आहेत.
Ans: असीम मुनीर आणि पीपीपी यांच्यात वाढत्या समन्वयामुळे बिलावल भुट्टो यांना पुढील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याच्या चर्चा आहेत.