Pakistan is looking for china's news Air Defense system
इस्लामाबाद:भारतासोबतच्या लष्करी संघर्षात पाकिस्तानची चीनकडून घेतलेली हवाई संरक्षण प्रणाली पूर्णत:नष्ट झाली आहे. मात्र पाकिस्तान आता पुन्हा चीनची नवीन HQ-19 संरक्षण प्रणाली विकत घेण्याचा विचार करत आहे. क्वालालंपूर डिफेन्स सिक्यिुरिटी एशियाने दिलेल्या माहितीनुसार, ही हवाई संरक्षण प्रणाली आणि ४० जे-३५ स्टेल्थ लढाऊ विमाने पाकिस्तान खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहे. २०२६ पर्यंत ही विमाने पाकिस्तानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
सध्या पाकिस्तानच्या हवाई दलात भारतविरोधी अपयशानंतर असंतोषाचे वातावरण आहे. अशावेळी चीनची ही नवीन हवाई संरक्षण प्रणाली HQ-19 पाकिस्तान खरेदी करण्याचा विचार करत आहे.
चीनची HQ-19 हवाई संरक्षण प्रणाली ही, बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २०२४ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. याची किंमत अंदाजे प्रति किलोमीटर तीन हजार रुपये आहे. डिफेन्स सिक्युरिटी एअरने म्हटले आहे की, लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची प्रणाली भारतविरोधात वापरली जाऊ शकते.
या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रणालीचा उपयोग भारताच्या ब्रह्मोस आणि स्कॅल्प-इजी सारख्या सुपरसॉनिक आणि निकट-सुपरसॉनिक क्रझ क्षेपणास्त्रांविरोधात वापरली जाऊ शकते. तसेच भारताच्या अग्नि मालेकेतील बॅलेस्टिक क्षेपमास्त्रांविरोधातही याचा वापर केला जाऊ शकतो. सध्या भारताकडे सर्वोत्त क्षेपणास्त्र प्रणाली S-400 आहे. ही रशियाकडून खरेदी केलेली आहे.
चीनची HQ-19 हवाई संरक्षण प्रणाली चायना एरोस्पेर सायन्स ॲंड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनने विकसित केलेली आहे. ही प्रणाली क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यासाठी हिट-टू-किल पद्धतीचा वापर करते. ही प्रणाली 8/8 च्या ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉंचरवर बसवण्यात आली आहे, यामध्ये सहा क्षेपणास्त्र संरचना आहे.
या प्रणालीमध्ये कमांड ॲंड कंट्रोल सिस्टीम आणि शक्तिशाली रडार, टाइप 610 A चा समावेश आहे. ही प्रणाली अंदाजे ४ हजार किलोमीटरपर्यंत शस्त्र डिटेक्शन करते. ११९० च्या दशकाच्या उत्तरार्धात HQ-19 चा विकास सुरु करण्यात आला होता. या प्रणालीची पहिली चाचणी २०२१ मध्ये चीनने केली. यामध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या HQ-19 क्षेपणास्त्र बसववण्यात आले आहे.
सध्या पाकिस्तानकडे चीनच्या HQ-9 लांब पल्ल्याच्या आणि HQ-16 मध्यम पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली आहे. परंतु भारताशी लष्करी संघर्षादरम्यान चीनच्या या हवाई संरक्षण यंत्रणांचा कमकुवतपणा उघड झाला. पाकिस्तानकडे असलेली चीनची हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात अयशस्वी ठरली.