
Xi Jinping lost sleep over US attack on Venezuela What is the oil-satellite-technology connection
China investment risk Venezuela 2026 : अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर केवळ दक्षिण अमेरिकाच नाही, तर सातासमुद्रापार असलेल्या चीनमध्येही प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांची झोप उडवली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, चीनने गेल्या दोन दशकांत व्हेनेझुएलाला आपला ‘लॅटिन अमेरिकन बालेकिल्ला’ बनवण्यासाठी केलेली अवाढव्य गुंतवणूक. तेल पुरवठा, उपग्रह तंत्रज्ञान आणि डिजिटल नेटवर्क अशा तीन आघाड्यांवर चीनला आता मोठ्या नुकसानीची भीती वाटत आहे.
चीनने व्हेनेझुएलाच्या एल सोम्ब्रेरो (El Sombrero) आणि लुपा (Luepa) येथे अत्यंत प्रगत उपग्रह ट्रॅकिंग आणि ग्राउंड स्टेशन्स उभारली आहेत. ही केंद्रे चीनच्या VRSS-2 सारख्या उपग्रहांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही केंद्रे केवळ नागरी कामासाठी नसून, अमेरिकेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चीन याचा वापर करत होता. आता अमेरिकन लष्कर व्हेनेझुएलात असल्याने ही संवेदनशील माहिती आणि तंत्रज्ञान अमेरिकेच्या हाती लागणे, हा चीनसाठी सर्वात मोठा लष्करी धक्का (Intelligence Failure) मानला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War: ‘शस्त्रे सोडली होती, पण आता पुन्हा उचलेन’ Maduro अटकेनंतर आता या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांचाही ट्रम्पला युद्धाचा इशारा
चीन हा व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा कर्जदार आणि तेलाचा प्रमुख खरेदीदार आहे. चीनच्या ‘चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन’ (CNPC) ने येथील तेल विहिरींचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. ट्रम्प यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल आता अमेरिकन कंपन्यांच्या नियंत्रणात असेल. यामुळे चीनने दिलेली ६० अब्ज डॉलर्सची कर्जे आणि त्यांच्या तेल कंपन्यांचे करार रद्द होण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. चीनच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा एक मोठा ‘ब्लॅकआउट’ ठरू शकतो.
Taipei based UDN News reports that the Chinese Air defense system failed spectacularly in Venezuela. U.S. military launched a powerful electronic warfare offensive to suppress Venezuela’s radar screen with electromagnetics,& then used anti-radiation missiles to make Venezuela’s… pic.twitter.com/dSISHw6Rv9 — Rohit Sharma 🇺🇸🇮🇳 (@DcWalaDesi) January 4, 2026
credit : social media and Twitter
व्हेनेझुएलाची संपूर्ण डिजिटल पायाभूत सुविधा हुआवेई आणि झेडटीई या चिनी कंपन्यांनी उभारली आहे. मादुरो सरकार या तंत्रज्ञानाचा वापर करून विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा आरोप अमेरिकेने अनेकदा केला होता. आता अमेरिकेच्या मदतीने स्थापन होणारे नवे सरकार चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. असे झाल्यास, संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील चीनचे सायबर वर्चस्व संपुष्टात येईल आणि अमेरिकेला या नेटवर्कचा डेटा ॲक्सेस करण्याची संधी मिळेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Old Rock Day 2026: खडक नाही, तर पृथ्वीचा जिवंत इतिहास! 7 जानेवारी ‘ओल्ड रॉक डे’ निमित्त उलगडलं 4 अब्ज वर्षे जुन्या खडकांचं रहस्य
चीनने या लष्करी कारवाईचा तीव्र निषेध केला असून, “हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आहे” असे म्हटले आहे. मात्र, अमेरिकेने याला ‘ड्रग्ज तस्करी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेली कारवाई’ असे स्वरूप दिले आहे. तैवानच्या प्रश्नावरून चीनला घेरणाऱ्या अमेरिकेने आता चीनच्या घरामागच्या अंगणात (दक्षिण अमेरिका) शिरून दिलेले हे आव्हान, २१ व्या शतकातील महासत्तांमधील संघर्षाचा नवा अध्याय ठरला आहे.