पाकिस्तानमध्ये Tik-Tok स्टारची घरात घुसून हत्या; 17 वर्षीय तरुणीसोबत कोणाची होती दुश्मनी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ सुरु आहे. एकीकडे बीएल आर्मी आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. पाकिस्तानमध्य एक दु:खद आणि धक्कादायक घटना घडली आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉक स्टार सना युसूफची हत्या करण्यात आली आहे. ही घटना टिकटॉकस्टार सनाच्या इस्लामाबादमधील निवासस्थानी घडली. टिकटॉक स्टार सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सना युसूफ ही मूळची अप्पर चित्रालची रहिवासी आहे. तिला भेटायला आलेल्या एका पाहुण्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. आरोपीचा शोध सुरु करण्यात आले आहे. गोळ्या झाडल्यानंतर सनाला तातडीने रुग्णालयाते नेण्यात आले. पण रुग्णालयात गेल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्या वाढदिवसा दिवशी २ जून २०२५ रोजी ही घटना घडली.
In the murder case of Tiktoker Sana Yousuf, Islamabad Police has identified the shooter with CCTV and other evidences, for now teams are formed for his arrest but search is yet pending https://t.co/PjUX7fMdAq pic.twitter.com/9FaTdWduxG
— Sahil Malik (@tackilam) June 3, 2025
सना युसूफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) मध्ये पाठवण्यात आला आहे. अद्याप हत्येमागील कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यामध्ये परस्पर वादातून, वैयक्तिक वादातून हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी सनाची आई फरजाना युसूफ यांनी एफआयआर दाखल केली आहे. सध्या पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. संशयिताची ओळख पटवण्याचे आणि त्याला अटक करण्यासाठी पोलिस तपास करत आहे. या घटनेनंतर इस्लामाबादच्या परिसरात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय सना युसूफ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती. तिचे टिकटॉकवर ७.२५ लाख आणि इन्स्टाग्रामवर सुमारे ५ लाख ऑलोवर्स आहेत. तिच्या लुकमुळे तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरशी केली जायची.
या प्रकरणाची तुलना जानेवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या एका प्रकरणाशी केली जात आहे. जानेवारी पाकिस्तानच्या क्वेटामध्ये एका मुलीची सोशल मीडिया पोस्टमुळे हत्या करण्यात आली होती. हिरा अन्वर (१५ वर्षीय) हिची तिच्या कुटुंबाने हत्या केली होती.