
Najam Sethi Chenab Dam threat Indus Waters Treaty India Pakistan news Marathi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा अत्यंत भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. सिंधू पाणी करारावरून (Indus Waters Treaty) सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) माजी प्रमुख नजम सेठी यांनी भारताला उघडपणे लष्करी कारवाईची आणि अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताने सिंधू कराराचे उल्लंघन करून पाकिस्तानकडे जाणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तानी लष्कर चिनाब नदीवर उभारण्यात येत असलेल्या भारतीय धरण व बोगदा प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांनी (Missiles) हल्ला करून ते नष्ट करेल, असा चिथावणीखोर दावा सेठी यांनी केला आहे.
आयेशा नाझ यांच्यासोबतच्या एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना नजम सेठी यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्या आक्रमक धोरणाचा आव आणत हे विधान केले. हेग येथील ‘परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’च्या (Permanent Court of Arbitration) नुकत्याच आलेल्या निर्णयामुळे सिंधू कराराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चेत आला असतानाच सेठी यांचे हे वादग्रस्त वक्तव्य समोर आले आहे. सेठी यांच्या मते, सिंधू नदी प्रणाली हे पाकिस्तानच्या अस्तित्वाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे भारताने पाणी अडवणे हा पाकिस्तानवर थेट लष्करी हल्ला मानला जाईल आणि अशा परिस्थितीत पाकिस्तान आपले अस्तित्व वाचवण्यासाठी अण्वस्त्रांचा (Nuclear Weapons) वापर करण्यासही मागेपुढे पाहणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran war: युद्धाचा भडका! अमेरिकन नौदलाने Red Sea मधून 86 जहाजे वळवली; हुथींचे क्षेपणास्त्र हल्ले, जागतिक तेलाचे संकट गहिरे
नजम सेठी हे पाकिस्तानच्या सत्ताधारी पीएमएल-एन (PML-N) पक्षाचे नेते नवाझ शरीफ आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. यापूर्वी २०१३ मध्ये त्यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे प्रभारी मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या अपयशावर यापूर्वी टीका करणाऱ्या सेठी यांनी आता मात्र भारतीय जलप्रकल्पांवर हल्ले करण्याचे चिथावणीखोर वक्तव्य करून पाकिस्तानातील अंतर्गत राजकीय आणि लष्करी असंतोष लपवण्याचा प्रयत्न केला आहे. भारत सरकार आणि लष्कराने अशा धमक्यांना नेहमीच पोकळ ‘गीदडभभकी’ ठरवून धुडकावून लावले असले, तरी यामुळे दोन्ही देशांतील तणावात मोठी वाढ झाली आहे.
एकीकडे सिंधू पाणी करारावरून युद्धाची भाषा वापरली जात असताना, दुसरीकडे भारत आणि इराण यांच्यातील वाढत्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे मानले जाणारे पाकिस्तानी-अमेरिकन उद्योगपती साजिद तरार यांनी इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय बैठकीवर जोरदार टीका केली आहे. तरार यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, भारताचा कल सातत्याने इस्रायलच्या बाजूने राहिला असताना आणि पाकिस्तानने इराणला कठीण प्रसंगात मदत केली असतानाही, इराणी नेतृत्व भारताशी घट्ट मैत्री का करत आहे, हे समजण्यापलीकडचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
साजिद तरार यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यास स्पष्ट नकार दिला होता. याशिवाय, अमेरिका इराणवर नवनवीन निर्बंध लादत असतानाही, पंतप्रधान मोदी यांनी इराणसोबतचा चाबहार बंदर प्रकल्प आणि व्यापार सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. तरार यांच्या मते, इराणचा हा दृष्टिकोन पाकिस्तानच्या पाठीत खंजीर उपसण्यासारखा आहे. अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाशी संबंध असलेल्या तरार यांनी पाकिस्तानात लष्करप्रमुख असिम मुनीर यांचे कौतुक करताना, भारताच्या यशस्वी मुत्सद्देगिरीमुळे पाकिस्तानात निर्माण झालेली हताश भावना उघड केली आहे.