Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीतीमुळे पाकिस्तानी सैन्याचे धाबे दणाणले; बलुचिस्तान नियंत्रणाबाहेर अन् स्वातंत्र्याची घोषणा

Balochistan army withdrawal : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची स्थिती ढासळलेली असताना बलुचिस्तानमधील हालचालींनी इस्लामाबादची चिंता आणखी वाढवली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 17, 2025 | 08:49 AM
Pakistan lost 80% of Balochistan army fears leaving after India defeat

Pakistan lost 80% of Balochistan army fears leaving after India defeat

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद/क्वेटा – भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची स्थिती ढासळलेली असताना बलुचिस्तानमधील हालचालींनी इस्लामाबादची चिंता आणखी वाढवली आहे. बलुच नेत्यांनी पाकिस्तानपासून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली असून, पाकिस्तानचा या प्रदेशावरचा ताबा आता केवळ कागदोपत्री उरलेला आहे. बलुचिस्तानच्या जवळपास ७० ते ८० टक्के भूभागावर पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण राहिलेले नाही, असा गंभीर दावा अमेरिकास्थित बलुच प्रतिनिधी रझाक बलुच यांनी केला आहे.

पाक सैन्याची कोंडी, क्वेटाच्या बाहेरही जाण्याची भीती

रझाक बलुच यांनी ‘TAG TV’ ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या सैन्याची दयनीय स्थिती उघड केली आहे. “अंधार पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्य क्वेटामधून बाहेरही पडत नाही,” असे ते म्हणाले. रात्रीच्या वेळी सैन्य रस्ते मोकळे करून घेतं, पण गस्त घालण्याचीही हिंमत करत नाही. ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनीही आताशा ही स्थिती गुपचूप मान्य केली आहे.”

स्वातंत्र्याची घोषणा आणि भारताला आवाहन

बलुच स्वातंत्र्य चळवळीने आता सार्वजनिक रूप धारण केले असून, बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच आणि इतर कार्यकर्त्यांनी स्वतंत्र बलुच राष्ट्राची घोषणा केली आहे. रझाक बलुच यांनी भारत आणि अमेरिका यांच्याकडे राजकीय आणि धोरणात्मक पाठिंब्याचे आवाहन केले आहे. “जर भारताने आम्हाला साथ दिली, तर बलुचिस्तान भारतासाठी खुले होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “भारत, अमेरिका आणि अन्य लोकशाही देशांनी बलुच स्वातंत्र्यलढ्याला मान्यता द्यावी आणि आमच्या प्रतिनिधींना स्वीकारावे.” त्यांनी इशारा दिला की, “जर मदत उशिरा मिळाली, तर एक क्रूर सैन्यसत्ता उदयास येईल, जी संपूर्ण उपखंडासाठी धोकादायक ठरेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Sperm Doner: सिरीयल स्पर्म डोनर! 180 हून अधिक मुलांचा बाप महिलांविरुद्ध रचत होता मोठा कट

‘बांगलादेशप्रमाणे पळून जावे लागेल’ – पाक सैन्याला इशारा

रझाक बलुच यांनी पाकिस्तानच्या सैन्याला कडक इशारा देत म्हटले की, “बांगलादेशप्रमाणे अनवाणी पळून जाण्याऐवजी सन्मानाने माघार घ्या.” त्यांनी बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये पाक लष्कराची दडपशाही थांबवण्याची मागणी केली.

बलुच लिबरेशन आर्मीचे हल्ले, चीनही लक्ष्य

गेल्या काही महिन्यांत बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्करावर आणि चीनच्या गुंतवणुकीवर जोरदार हल्ले चढवले आहेत. चिनी प्रकल्पांचे सतत उद्‌ध्वस्त होणे हे बीजिंगसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. पाकिस्तान-चीन आर्थिक मार्ग (CPEC) बलुचिस्तानमधूनच जात असल्याने हा भाग पाकिस्तानसाठी धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट संदेश दिला की, “बलुचिस्तान पाकिस्तान नाही.” त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही एकटे नाही आहात, बलुच देशभक्त तुमच्या सोबत आहेत.”

नवीन बंगलादेशाची चाहूल?

विश्लेषकांच्या मते, बलुचिस्तानमधील ही स्वातंत्र्याची चळवळ केवळ दहशतवादी किंवा फुटीरवादी हालचाल न राहता राजकीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उचल घेण्यास तयार झाली आहे. 1971 मध्ये बंगलादेश ज्या मार्गाने स्वतंत्र झाला, त्या धर्तीवर बलुचिस्तानची वाटचाल सुरू आहे, असेही काही राजकीय निरीक्षक सूचित करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इशाक दार यांचा खोटारडेपणा उघड; AI-निर्मित बातमीचा हवाला देत पाक लष्कराचे खोटे कौतुक, ‘डॉन’ने केला पर्दाफाश

ऑपरेशन सिंदूर

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला लष्करी आणि रणनीतिक स्वरूपात मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या घोषणांनी पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली आहे. भारतासमोर आता धोरणात्मक संधी आहे – बलुच स्वातंत्र्याला मदत करून केवळ पाकिस्तानलाच नाही, तर चीनलाही पश्चिमेकडून अडचणीत आणण्याचा मार्ग खुला होतो. भविष्यात या चळवळीचा उपखंडाच्या राजकारणावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Pakistan lost 80 of balochistan army fears leaving after india defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • pakistan

संबंधित बातम्या

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला
1

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
2

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
3

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
4

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.