Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Pakistan News : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी तुरुंगातून रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले आहेत. प्रकृती खालावल्याचा दावा करत इम्रान खान यांच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 18, 2026 | 04:40 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • इम्रान खान यांना काय त्रास होत आहेत
  • जनतेचा दबाव वाढला
  • पाकिस्तानी लष्करासोबतचा वाद
Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक- ए -इन्साफ ( PTI ) चे संस्थापक इम्रान खान यांची प्रकृती आणि वैद्यकीय उपचारांबाबबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे . न्यायालयाने इम्रान खान यांना रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगातून इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे निर्देश दिले आहेत .

इम्रान खान यांना काय त्रास होत आहेत

इम्रान खान यांना ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात ठेवण्यात आले आहे . त्यांच्या आरोग्याबाबत यापूर्वीही त्यांच्या कुटुंबीयांनी आणि PTI ने प्रश्न उपस्थित केले होते . डोळ्यांच्या समस्येमुळे त्यांना विशेष उपचारांची गरज असल्याचा दावा करण्यात आला होता . त्याचबरोबर रक्तदाब याचा ही त्रास आहे .

तसेच इम्रान खान यांच्या वकिलांनी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना त्यांच्या पसंतीच्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची आणि शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची मागणी केली होती . या याचिकेत त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांना तसेच कुटुंबियांना वैद्यकीय उपचारांच्या वेळी प्रवेश देण्याची मागणीही करण्यात आली होती .

Donald Trump: ‘तू फेक रिपोर्टर आहेस…’, पत्रकाराने असा कोणता प्रश्न विचारला ज्यामुळे ट्रम्प संतापले, किम जोंग उनशी काय संबंध?

जनतेचा दबाव वाढला

पाकिस्तान मध्ये जेव्हा इम्रान खान याना अटक करत होते त्याचवेळी खूप मोठा गदारोळ झाला होता . खूपच कमी कालावधीत क्रिकेटर पासून पंतप्रधान झालेले इम्रान खान हे पाकिस्तान मधील मोठे राजकीय नेते म्हणून उदयास येत होते . तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले . गेल्या तीन वर्षात त्यांच्यावर कोणतेही आरोप अजून सिद्ध झाले नाहीत .

एकतर इम्रान खान यांना अटक केल्यापासून त्यांच्या चाहत्यांनी आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठं मोठे मोर्चे , आंदोलने काढून त्यांना सोडण्याची मागणी केली . आणि अजून ही वारंवार मोर्चे काढण्याचे इशारे देऊन इम्रान खान यांना सोडण्याची मागणी केली जाते . पण POK मधील आंदोलन तीव्र झाल्यानंतर आणि इम्रान खान यांची तब्येत खालावल्या नंतर पाकिस्तान मधील जनतेचा रेटा खूपच वाढला . आणि सर्वोच्च न्यायालयातून अखेर एक समाधान कारक निर्णय द्यावा लागला . असे राजकीय जाणकार सांगतात .

Tupac Murder Trial : 30 वर्षांनी टुपॅक हत्या प्रकरणाचा खटला सुरू!

पाकिस्तानी लष्करासोबतचा वाद

पाकिस्तान मध्ये सत्ता ही नावापुरती प्रशासनाकडे असते आणि खरे सूत्रधार ही पाकिस्तानी आर्मी आहे . त्यामुळे जेव्हा जेव्हा तेथील पंतप्रधान हे आर्मीच्या विरोधात जाऊन आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात . तेव्हा आर्मी त्यांना तुरुंगात घालून पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करते . हा इतिहास देखील राहिला आहे पाकिस्तानचा .

आणि सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी सुद्धा हेच केले , पाकिस्तानमध्ये एक लोकशाही आणायची संधी मिळाल्यावर तसा प्रयत्न केला आणि पाकिस्तानच्या आर्मी सोबत त्यांचा संघर्ष सुरु झाला . असे राजकीय विश्लेषक सांगतात .

Web Title: Pakistan news concern over imran khans health major order from the supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Imran khan
  • pakistan army
  • Pakistan News

संबंधित बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
1

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त
2

World Bank : भारत ‘दक्षिण आशिया’चा केंद्रबिंदू! पाकिस्तानला जागतिक बँकेच्या यादीतून काढले बाहेर; पाकिस्तानी संतप्त

Asim Munir: पाकिस्तानचे होणार 15 तुकडे? लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या प्रस्तावाने राजकीय वादळ
3

Asim Munir: पाकिस्तानचे होणार 15 तुकडे? लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या प्रस्तावाने राजकीय वादळ

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?
4

Pakistan News :इराण-येमेनवर हल्ले करू नका ; पाकिस्तानमध्ये सरकारवर दबाव वाढला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.