Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Politics: पाकिस्तानमध्ये संविधानाचा नवा वाद; न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि राष्ट्रपती झरदारींमध्ये थेट संघर्ष

पाकिस्तानमध्ये, राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि सरकार यांच्यात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून वाद सुरू आहे. सरकार राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी करू शकते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 07, 2026 | 02:24 PM
pakistan president zardari vs government high court judges appointment controversy marathi news

pakistan president zardari vs government high court judges appointment controversy marathi news

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष
  • राष्ट्रपतींची मंजुरी बायपास करण्याची तयारी
  • न्यायव्यवस्थेवर गंभीर परिणाम

पाकिस्तानमध्ये (Pakistan) पुन्हा एकदा मोठा घटनात्मक आणि राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. देशाचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्यात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून थेट संघर्ष पेटला आहे. पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने (JCP) जुलै महिन्यात उच्च न्यायालयात १९ अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती आणि ५ न्यायाधीशांना सेवेत कायम ठेवण्याची शिफारस केली होती. नियमानुसार पंतप्रधानांनी यासंबंधीचा प्रस्ताव (समरी) मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला. मात्र, अनेक दिवस उलटूनही राष्ट्रपती झरदारी यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. यामुळे आता सरकार राष्ट्रपतींची स्वाक्षरी न वाट पाहता थेट अधिसूचना जारी करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

पाकिस्तानच्या संविधानातील कलम ४८(१) नुसार, पंतप्रधानांनी किंवा मंत्रिमंडळाने पाठवलेल्या सल्ल्यावर राष्ट्रपतींनी १५ दिवसांच्या आत निर्णय घेणे किंवा तो पुनर्विचारासाठी परत पाठवणे बंधनकारक असते. या १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढील १० दिवसांत राष्ट्रपतींनी सुधारित प्रस्तावाला मंजुरी देणे अपेक्षित असते. मात्र, १५ दिवसांहून अधिक काळ लोटूनही राष्ट्रपती कार्यालयाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे कायदा मंत्रालयाने स्पष्ट संकेत दिले आहेत की, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी न केल्यास घटनात्मक तरतुदींचा वापर करून सरकार स्वतःच या नियुक्तीची अंतिम अधिसूचना जारी करू शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangkok Shooting: थायलंडमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचे भयानक कृत्य; शिक्षकावर गोळीबार करून केली आत्महत्या, 15 विद्यार्थी जखमी

या विलंबाचे अत्यंत गंभीर परिणाम पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेवर आधीच दिसू लागले आहेत. पेशावर उच्च न्यायालयातील ४ अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ ४ ऑगस्ट रोजी संपला, परंतु राष्ट्रपतींची मंजुरी न आल्याने त्यांना आपले पद सोडावे लागले आहे. तसेच सिंध उच्च न्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशाचा कार्यकाळ २९ जुलै रोजी संपल्याने त्यांनाही सेवा थांबवावी लागली आहे. राष्ट्रपतींच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची चणचण निर्माण झाली असून हजारो प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीवर विपरीत परिणाम होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाला आता न्यायालयीन लढ्याचे स्वरूप आले आहे. वकील लुकमान जफर चौधरी यांनी त्यांचे वकील झाहिद आसिफ चौधरी यांच्यामार्फत इस्लामाबाद उच्च न्यायालयात (IHC) एक रिट याचिका दाखल केली आहे. न्यायिक आयोगाने २० आणि २१ जुलै रोजी केलेल्या शिफारसींनुसार राष्ट्रपतींना या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. न्यायमूर्ती अरबाब मुहम्मद ताहिर यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, सरकार पुढील ४८ तासांत या नियुक्तींसाठी स्वतःहून अधिसूचना जारी करू शकते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर याचिकेच्या मान्यतेवर (Maintainability) आपला निर्णय राखून ठेवला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US News: अमेरिकेत भारतीय घरमालकाची विकृत मागणी, महिलेचा नकार अन् पुढे जे घडले ते धक्कादायक; न्याय विभागाची कठोर कारवाई

दुसरीकडे, राष्ट्रपती कार्यालयातील सूत्रांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपतींच्या घटनात्मक अधिकारांना बायपास करून परस्पर निर्णय घेतल्यास देशात मोठा राजकीय आणि घटनात्मक पेचप्रसंग उभा राहील. हा संवेदनशील मुद्दा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात प्रत्यक्ष चर्चेतूनच सोडवला गेला पाहिजे, असे मत प्रेसिडेन्सीकडून व्यक्त केले जात आहे. मात्र, कायदा मंत्री अकील मलिक यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार संपूर्ण प्रक्रिया घटनात्मक चौकटीत राहूनच पूर्ण करेल. पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि राष्ट्रपतींमधील हा नवा वाद देशाच्या न्यायव्यवस्थेला कोणत्या वळणावर घेऊन जातो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pakistan president zardari vs government high court judges appointment controversy marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Court
  • Pakistan News
  • Shehbaz Sharif

संबंधित बातम्या

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा
1

CDSCO : गोऱ्या रंगाच्या हव्यासापोटी विकत घेताय गंभीर आजार? पाकिस्तानातून येणाऱ्या ‘या’ 2 प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधनांवर बंदीचा इशारा

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस
2

Pakistan News: पाकिस्तानात १० वीच्या परीक्षेत शीख तरुण चमकला! भारताच्या SGPC देणार ५१ लाखांचे बक्षीस

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड
3

Washim News: राष्ट्रीय लोकअदालतीत ५९४ प्रकरणे निकाली; १९ कोटीहून अधिक रक्कमेची तडजोड

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस
4

Masood Azhar : FATF ची भीती की नवा डाव? 26/11 मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार मसूद अझरवर पाकिस्तानात 70 लाख रुपयांचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.