
Lok Adalat 594 Cases Settled
याप्रसंगी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. एस. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. लोक अदालतीदरम्यान मोटार अपघात दावा प्रकरण क्र. ४०/२०२२ हा तडजोडीने निकाली काढून न्यायमूर्तीच्या हस्ते संबंधित पक्षकारास ९५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच उच्च न्यायालयाने विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश दिलेले २ दिवाणी दावे तडजोडीने पूर्ण झाल्याने, त्या दाव्यांचा लोक अदालतीचा ‘निवाडा’ न्यायमूर्तीच्या हस्ते पक्षकारांना प्रदान करण्यात आला.
एकूण विचारार्थ प्रकरणेः प्रलंबित ४ हजार ६२० आणि दाखलपूर्व ६ हजार ४८८,
निकाली काढलेली प्रकरणेः ५१९ प्रलंबित आणि ७५ दाखलपूर्व (एकूण ५९४ प्रकरणे)
एकूण तडजोड रक्कमः १९ कोटी ७० लक्ष ५० हजार ७११ (एकूण १९ कोटी सत्तर लाख पन्नास हजार सातशे अकरा रुपये)
ही राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी वाशिम जिल्हा वकील संघ तसेच जिल्हा पोलिस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले.