
pakistan protests
माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण
कान समर्थकांचे चलो अदियाला आंदोलन
गेल्या एक आठवड्यापासून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा, त्यांची प्रकृती खराब असल्याचा अफवा पसरल्या आहेत. शिवाय या अफवांदरम्यान खान यांच्या तीन बहिणी नूरीन खान, अलीमा खान आणि उज्मा खान यांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या भावाला भेटू दिलेले नाही. जेव्हा त्यांनी भेटीची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे लाठीमार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने चलो आदियाला चे आवाहन केले आहे.
आदियाला तुरुंगातून इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आज निदर्शने सुरु करण्यात आली आहेत. खैबर-पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी याची घोषणा केली आहे. तसेच खान यांच्या जिवंत असण्याचा पुरावा देखील मागितला जात आहे. सध्या त्यांच्या बहिणींनी देखील तुरुंगाबाहेर निषेध सुरु केला आहे. खान यांच्या ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार भडकवण्याच्या आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे ते २०२३ पासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात आहे. तसेच त्यांच्या कुटुंबींयाना भेटून दिले जात नसल्याने त्यांच्या निधनांच्या अफवांना बळ मिळाले आहे.
सध्या पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात देखील मोठा गोंधळ सुरु आहे. अनेक पीटीआय पक्षाच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शाहबाज शरीफ आणि असीम मुनीर तुरुंगात कोणालाही इम्रान खानला का भेटू दिले जात नाही असा प्रश्न केला आहे. दरम्यान याच वेळी पाकिस्तान सरकार आणि अदियाला तुरुंगाने इम्रान खान यांच्या निधनाच्या किंवा त्यांची प्रकृती खराब असल्याचा अफवांना फेटाळले आहे. संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी उपहासात्मक टीका करत, खान यांना तुरुंगात पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवणे मिळत असल्याचे, ना टीव्ही देण्यात आला आहे. व्यायामासटी फिटनेस मशीन आहे. खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि अनेक चांगल्या सुविधा देण्यात आली असल्याची म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत
Ans: पाकिस्तानमध्ये सध्या खान यांच्या समर्थकांनी आणि पीटीआय पक्षाने रावळपिंडीकडे चलो अदियालाचे आवाहन करत मोर्चा काढला आहे. यामुळे रावळपिंडीत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सराकरेने रावळपिंडीत कलम १४४ लागू केले आहे.
Ans: पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीकडे मोर्चा काढला आहे. यामध्ये खान यांच्या सुटकेची मागणी केली जात आहे, तसेच त्यांच्या जिवंत असण्याचा पुरव्याची मागणी केली जात आहे.