पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची CDF म्हणून २९ नोव्हेंबरपर्यंत नियुक्ती करण्यात येणार होती. मात्र पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अद्याप त्यांच्या नियुक्तीच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केलेली नाही. यापूर्वीच त्यांनी लंडनला पळ काढला असल्याचे म्हणत आहे. शाहबाज शरीफ २६ नोव्हेंबर रोजी बहरीनला रवाना झाले होते, त्यानंतर त्यांनी २७ नोव्हंबरला अचानक लंडनला अनाधिकृत भेट दिली. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माध्यमांमध्ये, पंतप्रधान शाहबाज शरीफ असीम मुनीर यांना शक्तीशाली पद देऊ इच्छित नसल्याने या प्रक्रियेपासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी पाकिस्तानच्या संसदेने १२ नोव्हेंबर रोजी २७ वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती. या घटनादुरुस्तीनुसार पाकिस्तानी लष्कराचे अधिकार वाढणार होचे. यावर संयुक्त राष्ट्रांनी चिंता देखील व्यक्त केली होती. जर शाहबाज यांनी असीम मुनीरला CDF बनवण्याच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली तर मोठा अनर्थ होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे मुनीरकेड पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे कमांड येईल. ज्यामुळे ते पाकिस्तानमधील सर्वात शक्तीशाली व्यक्ती होतील.
मुनीर यांची २९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. याचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता. हा २८ नोव्हेंबर २०२५ रोजी संपला असून त्यांना पुन्हा लष्कर प्रमुख म्हणून निवडण्यासाठी २९ नोव्हेंबरला CDF च्या अधिसूचनेवर स्वाक्षरी करण्यात येणार होती. पंतप्रधान शाहबाज शरीफ सोमवारी(१ डिसेंबर) दुपारपर्यंत इस्लामाबादमध्ये परत येणार आहे. त्यांच्या परतल्यानंतर संसंदेत CDFअधिसूचनेवर निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या संपर्ण जगाचे लक्ष असीम मुनीरला पुन्हा लष्करप्रमुख पद मिळते का? याकडे लागले आहे.
पाकिस्तानच्या संसदेत २७ व्या घटनादुरुस्तीमुळे अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रांचे निरिक्षण आणि नियंत्रण लष्कराच्या हाती. येईल. पूर्वी ही जबाबदारी पाकच्या राष्ट्रीय कमांड विभागाकडे होती. पण आता ही जबाबदारी NSC कडे असणार आहे, परंतु NCS साठी प्रमुखाची निवड ही लष्करप्रमुखाच्या शिफारशीनुसार होणार आहे. यामुळे मुनीर यांना त्यांचे लष्करप्रमुख पद मिळाल्यास याचे सर्व अधिकार त्यांमा मिळतील.
सीम मुनीरच्या हाती CDF पद आल्यास जागला अण्वस्त्र हल्ल्यांचा धोका निर्माण होईल. विशेष करुन याचा भारताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक काळापासून संघर्ष सुरु आहे. शिवाय असीम मुनीर यांनी नेहमीच भारतविरोधी विधाने केली आहेत. तसेच पाकिस्तानी लोकांनी भारतविरोधी भडकवण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला आहे. भारतातील पहलगाम हल्ल्यापूर्वी (Phalagam Attack) देखील त्यांनी भारतविरोधी विधान केले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.






