माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची तुरुंगात हत्या झाल्याचे, त्यांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या होता. काहीजणांनी त्यांचा प्रकृती खालवल्याचा दावाही केला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी खान यांच्या बहिणी नूरीन खान, अलीमा खान आणि उज्मा खान यांना त्यांच्या भावाला भेटू दिले जात नव्हेत. त्यांच्यावर क्रूरपणे लाठीमार करत तुरुंगातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले होते.
खान यांच्या बहिणींनी तुरुंग प्रशासनावर त्यांच्यावर मारहाण केल्याचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता. तसेच इम्रान खान यांच्या पक्षानेही सरकारवर खान यांच्यासोबत तुरुंगात चुकीची वागणून दिली जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे पीटीआय पक्ष आणि खान समर्थकांमध्ये तीव्र वातावरण तापले होते. तुरुंगाबाहेर मोर्चा काढण्यात आला होता.
दरम्यान पाकिस्तनच्या सरकारने इम्रान खान यांच्यावर अदियाला तुरुंगात अत्याचार होत असल्याच्या आणि निधन होत असल्याचा आरोपांना पूर्णविरामो दिला आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंग प्रशासनाने इम्रान खान यांचे निधन झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांची प्रकृती देखील चांगली असल्याचे म्हटले आहे. खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
याच वेळी आसिफ ख्वाजा यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी दावा केला आहे की, इम्रान खान यांना तुरुंगात सर्व आराम आणि सुविदा दिल्या जात आहे. ख्वाजा यांनी उपहासात्मक टिप्पणी करत म्हटले की, त्यांना पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवण दिले जात आहे. त्यांना टीव्ही देण्यात आला आहे. व्यायामासटी फिटनेस मशीन आहे. खान यांना तुरुंगात डबल बेड, मखमली गादी आणि अनेक चांगल्या सुविधा देण्यात आली असल्याची उपहासात्मक टिप्पणी ख्वाजा यांनी केली आहे.
Ans: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी माजी पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफेवर उपहासात्मक टिप्पणी करत त्यांना पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूपेक्षाही चांगले जेवण दिले जातअसल्याचे म्हटले आहे.
Ans: माजी पाक PM इम्रान खानचा मृत्यूवर अदियाला तुरुंगाने खान यांच्याबाबत पसरवण्यात आलेल्या निधनाच्या आणि प्रकृती खराब झाल्याच्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.






