Photo Credit- Social Media पाकिस्तान-तालिबान संघर्ष शिगेला
काबूल: पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडच्या काळात हा संघर्षाने अधिक धोकादायक बनला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हवाई हल्ल्यात जवळपास 50 तालिबानी लढवय्यांचा मृत्यू झाल्यानंतर, तालिबानने प्रत्युत्तरादाखल 20 पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवर कब्जा केला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही पाकिस्तावर जोरदार टीका होऊ लागली आहे.
दुसरीकडे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा दर्शवणारी डूरंड लाईन वरूनही दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. डूरंड लाईन ब्रिटिशांनी आखली होती, परंतु तालिबानला तिचे कोणतेही महत्त्व वाटत नाही. दुसरीकडे, पाकिस्तानी लष्कराने नाराजी व्यक्त केली असून सांगितले की, जर तालिबान डूरंड लाईन मान्य करत नसेल, तर पाकिस्तानही वाखान कॉरिडॉरवर अफगाणिस्तानचा दावा मान्य करणार नाहीत. वाखान कॉरिडॉर हा अफगाणिस्तानला चीनशी जोडणारा महत्त्वाचा भूभाग आहे आणि त्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व आहे.
पाकिस्तान आर्मीबाबत समोर आली मोठी माहिती; चीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताविरुद्ध नवी खेळी
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI तालिबानवर दबाव आणण्यासाठी ताजिकिस्तान आणि तालिबानविरोधी गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी लष्कर वाखान कॉरिडॉरवर कब्जा मिळवून ताजिकिस्तानपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. त्यामुळे भागात लष्कराची मोठ्या प्रमाणावर तैनाती करण्यात आली आहे.
तालिबान आणि TTP यांनी आता पाकिस्तानविरुद्ध एकत्रित हल्ला करण्याची योजना आखली आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्यानेही TTPला पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे. तालिबान आणि TTP यांच्यातील या युतीमुळे पाकिस्तानी लष्करासमोर गंभीर आव्हान उभे राहू शकते. तालिबानचे उप-विदेशमंत्री शेर मोहम्मद अब्बास यांनी पाकिस्तानला धमकी दिली आहे की, “अफगाण लढवय्ये अण्वस्त्रासारखे आहेत, जे पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवू शकतात.”
Russia- Ukraine War: युद्ध भडकले! रशियाचा यूक्रेनवर भयानक हल्ला; तब्बल 103 ड्रोन हल्ले अन्
या संपूर्ण प्रकरणात चीनने अजूनपर्यंत कोणतेही सार्वजनिक विधान केलेले नाही. वाखान कॉरिडॉर हा चीनसाठीही महत्त्वाचा असल्याने या प्रकरणाचा त्याच्या हितांवर परिणाम होऊ शकतो. या वाढत्या तणावामुळे पाक-अफगाण संबंध आणखी गुंतागुंतीचे होत आहेत, त्यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तालिबाननेही पाकिस्तानी लष्कराला पराभूत करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता त्यांचे लढवय्ये टीटीपी दहशतवाद्यांच्या सहकार्याने पाकिस्तानी सैन्यावर कुठेही हल्ला करू शकतील, असं तालिबानने म्हटलं आहे.
तर TTP आणि तालिबान या दोन्ही सैन्याने मिळून पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेत्यानेही याला मान्यता दिली आहे. तालिबान आणि टीटीपीने एकत्र हल्ला केल्यास पाकिस्तानी लष्कराच्या अडचणीत लक्षणीय वाढ होईल. दरम्यान, तालिबानचे उप परराष्ट्र मंत्री शेर मोहम्मद अब्बास यांनी पाकिस्तानला मोठी धमकी दिली असून अफगाणिस्तानचे लढवय्ये अणुबॉम्बसारखे आहेत जे पाकिस्तानला पाणी पाजवू शकतात.