रशियाचा यूक्रेनवर भीषण हल्ला (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
गेल्या तीन वर्षांपासून रशिया विरुद्ध यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्ध सुरू झाल्यापासून या युद्धाची दाहकता वाढली आहे. दोन्ही बाजूनी मोठे मोठे हल्ले एकमेकांवर केले जात आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यात यूक्रेनने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, अमेरिका निर्मित एटीएसीएमएस ओपरेशनल टेक्निकल क्षेपणास्त्र डागली. दरम्यान यूक्रेनने डागलेले क्षेपणास्त्र रशियन सुरक्षा यंत्रणेने हवेतल्या हवेत नष्ट केली. मात्र यूक्रेनने रशियाच्या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे.
यूक्रेनने केलेला हल्ला हा पाश्चात्य देशांचा पाठिंबा असल्याचा आरोप रशियाने केला आहे. दरम्यान यूक्रेनने केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे रशियाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर रशियाने देखील यूक्रेनवर हल्ला केला आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियावर निर्बंध वाढवण्याची मागणी केली आहे. याबाबत झेलेन्स्की यांनी एक्स सोशल मिडियावर पोस्ट देखील केली आहे
काय आहे झेलेन्स्की यांची पोस्ट?
रशियाकडून येणाऱ्या हल्ल्यांपासून रोज आम्ही आमच्या भूमीचे रक्षण करतो. काल रात्रीच यूक्रेनवर 103 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये 8,755 प्रदेश शस्त्र होती. मागील आठवड्यात रशियाने जवळपास 740 बॉम्ब आणि विविध अशा 50 मिसईल्सने हल्ला केला आहे.
Almost every day, we defend our skies against Russian missiles and drones. Just last night, Ukraine was attacked by 103 Shahed drones, which contained 8,755 foreign-made components. Over the past week, Russia has used more than 630 strike drones, approximately 740 guided aerial… pic.twitter.com/BGoIdMyVd1
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) January 5, 2025
युद्धादरम्यान रशियाने लागू केला टॅक्स; पर्यटकांच्या खिशावर होणार परिणाम?
सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. दरम्यान रशियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी, 1 जानेवारी 2025 पासून, रशियामध्ये पर्यटक कर लागू करण्यात आला आहे. हा कर पूर्वीच्या रिसॉर्ट शुल्काला बदलून लागू करण्यात आला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार, हॉटेल आणि इतर निवासांमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या निवास खर्चाच्या 1 टक्के अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे.
हा कर जुलै 2024 मध्ये रशियन कर संहितेमध्ये केलेल्या सुधारणा अंतर्गत सादर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सुधारणांमध्ये ‘पर्यटक कर’ नावाचे नवीन प्रकरण जोडण्यात आले आहे. या अंतर्गत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना स्थानिक कर म्हणून हा कर लागू करण्याचा अधिकार मिळाला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः पर्यटन उद्योग विकसित किंवा उभरत असलेल्या प्रदेशांमध्ये, हा कर आधीच लागू करण्यात आला आहे.
हेही वाचा: Russia Ukraine War: युद्धादरम्यान रशियाने लागू केला टॅक्स; पर्यटकांच्या खिशावर होणार परिणाम?
सरकारचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये, रशियन सरकारने कोकिंग कोलवरील निर्यात शुल्क पूर्वीच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कोळसा उद्योगाला समर्थन देण्यासाठी अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवरील शुल्क स्थगिती आता रशियाने कायम ठेवली आहे. रशियामध्ये पर्यटक कर लागू झाल्याने स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु पर्यटकांच्या खर्चात थोडी वाढ होणार आहे.
कोळशावरील निर्यात शुल्क हटवले
याशिवाय, रशियान सरकारने 1 जानेवारी 2025 पासून कोकिंग कोल, अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवर लागू असलेले निर्यात शुल्क अधिकृतपणे रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे शुल्क 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले होते आणि 2024 च्या शेवटपर्यंत अस्तित्वात होते. तथापि, 1 मे ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान अँथ्रेसाइट आणि थर्मल कोलवरील शुल्क तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.