भारताचा पाकिस्तानला इशारा (फोटो- टीम नवराष्ट्र)
ऑपरेशन सिंदूरने मोडले पाकिस्तानचे कंबरडे
दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार
भारतीय लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला इशारा
Indian Army Chief: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले. त्यातच आता भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भारत पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. ते राजस्थानच्या घडसाना येथे बोलत होते.
भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी जवानांना सतर्क आणि कोणत्याही कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचना केली. भारत पूर्णपणे तयार आहे. यावेळी आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 प्रमाणे संयम राखणार नाही. पाकिस्तानला आपले भौगोलिक अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. जवानांनी तयार राहिले पाहिजे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्हाला लवकरच संधी मिळेल. असे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मे महिन्यात हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे केले. या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने चार ते पाच एफ-१६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान भारताने सुमारे १२ पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यात ९ ते १० लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. त्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवत म्हटले की, ते भारतीय विमानांबद्दल पसरवत असलेल्या “प्रेमकथा” चालू ठेवल्या पाहिजेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे ते १० मे पर्यंत चालणारे ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, या कारवाईत भारताने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला लक्ष्य करून अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले केले.
हवाई दल प्रमुख म्हणाले, “आमच्या प्रणालींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे गंभीर नुकसान झाले आहे हे स्पष्ट आहे.” या कारवाईने पुन्हा एकदा भारतीय हवाई दलाची ताकद आणि सामरिक क्षमता सिद्ध केली आहे. ते म्हणाले, “आमच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली, विशेषतः अलीकडेच मिळवलेल्या S-400, ने गेम चेंजरची भूमिका बजावली. त्यांच्या रेंजने 300 किलोमीटर अंतरावरून पाकिस्तानी विमानांना नष्ट केले, जे आतापर्यंत नोंदवलेले सर्वात लांब जमिनीवरून हवेत मारा करणारे लक्ष्य आहे.”