Pakistan thanks Donald Trump for Kashmir mediation offer, says committed to 'promote peace'
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण होते. भारताने केलेल्या वॉटर स्ट्राईकने पाकिस्तान चवथाळला होता. तसेच त्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कास्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे देखील ऑपरेशिन सिंदूर मोहीमेंतर्गत उद्ध्वस्त केली. या कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला होता. गेल्या चार दिवसांपासून हा संघर्ष वाढत होता. याच वेळी 10 मे रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांत युद्धबंदीची दावा केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानने याची पुष्टी करत युद्धबंदी कराराची घोषणा केली आणि दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू करण्यात आली.
दरम्यान या युद्धबंदीनंतर अनेक देशांनी बारत आणि पाकिस्तानच्या या निर्णयाचे स्वागत केले. तसेच ट्रम्प यांनी देखील आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. याचा मला आनंद होत आहे. तसेच त्यांनी सांगितले की, यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी करुन दोन्ही देशांत युद्धबंदी घडवून आणली.
दरम्यान यानंतर ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला काश्मीर मुद्दा सोडवण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी दोन्ही देशांमध्ये काश्मीर समस्येवरही तोडगा काढणार आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी दोन्ही देशांसोबत काश्मीर मुद्यावरही चर्चा करणार आहे. हजार वर्षानंतर काश्मीर मुद्यावर चर्चा होणार, यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे ही चर्चा करु असे ट्रम्प यांनी म्हटले. यासाठी देव भारत आणि पाकिस्तानला चांगल्या नेतृत्त्वासाठी आशिर्वाद देवो.
दरम्यान त्यांच्या या ऑफरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ऑफरचे आभार मानले. तसेच पाकिस्तान देखील काश्मीर वाद सोडवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले. पाकिस्तानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी एक पोस्ट करत म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थीचे आभार मानतो, तसेच इतर मित्र राष्ट्रांच्या भूमिकेचेही कौतुक करतो. तणाव कमी करण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल आहे.
🔊PR NO.1️⃣3️⃣3️⃣/2️⃣0️⃣2️⃣5️⃣
Pakistan Welcomes President Trump’s Statemet.
Pakistan welcomes the statement by the US President Donald J. Trump @realDonaldTrump regarding Pakistan-India relations.
We acknowledge with appreciation the constructive role played by the United States,…
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 11, 2025
तसेच पाकिस्तानने असेही म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर वादावर तोडगा काढणे महत्वाचे आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदेच्या ठरावांचा उल्लेख पाकिस्तानने केला. पाकिस्तानने देश किंवा प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि समृद्धी वाढवण्यासाठी पाकिस्तान वचनबद्ध असल्याचेही म्हटले. तसेच अमेरिकेसोबत व्यापार संबंध दृढ करण्यासाठी देकील उत्सुक असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले.