Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश

Pakistan-Taliban : गेल्या दोन महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आहेत आणि दोन्ही देशांच्या सैन्यात सीमेवर चकमकही झाली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 21, 2025 | 01:48 PM
Pakistan threatens Taliban with rival support if demands ignored

Pakistan threatens Taliban with rival support if demands ignored

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानने तालिबानला तुर्कीमार्फत ‘अंतिम चेतावणी’ दिली असून त्यांच्या मागण्या न मानल्यास काबूलमध्ये सत्ता बदलाचा प्रयत्न करण्याचा इशारा दिला आहे.
  • पाकिस्तान तालिबानविरोधी नेते आणि गटांशी संपर्क साधत असून काबूलमध्ये संभाव्य बंडाची तयारी होत असल्याचे संकेत आहेत.
  • टीटीपीच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले आहेत आणि दोन्ही बाजू युद्धाच्या उंबरठ्यावर दिसत आहेत.

Pakistan militant backing Taliban warning : पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सीमेवर झालेल्या चकमकी, हवाई हल्ले आणि राजनैतिक विधाने पाहता, या दोन इस्लामी राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. आता पाकिस्तानने अधिकृतपणे तालिबान सरकारला “अंतिम संदेश” दिला असून, हा संदेश भविष्यातील मोठ्या लष्करी कारवाईचा संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

 अहवालानुसार, पाकिस्तानने तुर्कीच्या मध्यस्थीद्वारे अफगाण तालिबानला अल्टिमेटम दिला आहे. शाहबाज शरीफ सरकार आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तालिबानला स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, त्यांनी पाकिस्तानच्या मागण्या मान्य कराव्यात आणि अफगाण भूमीवरून टीटीपी (Tehreek-e-Taliban Pakistan) च्या हल्ल्यांना आळा घालावा. जर तालिबानने हे पाऊल उचलले नाही तर पाकिस्तान काबूलमधील सत्तेला उलथवून लावण्यासाठी कार्यरत असलेल्या इतर शक्तींना पाठिंबा देऊ शकतो. हा संदेश तालिबानसाठी केवळ इशारा नसून भविष्यातील मोठ्या संघर्षाची पूर्वसूचना मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Chemical Weapons : ‘पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात फॉस्फरस बॉम्ब…’, मीर यार बलोच यांचा आंतरराष्ट्रीय लक्षवेधी दावा

तालिबानविरोधी गटांना पाकिस्तानचा गुप्त पाठिंबा?

काबूलचे भारताशी वाढते संबंध पाकिस्तानला त्रासदायक वाटत आहेत. त्यामुळे आता इस्लामाबाद तालिबानला “सुरक्षा धोका” मानत आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानातील अनेक विरोधी गटांना जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सुरक्षा व गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तान सध्या खालील प्रमुख नेत्यांशी संपर्कात आहे:

  • हमीद करझाई
  • अशरफ घनी
  • अहमद मसूद (National Resistance Front)
  • अब्दुल रशीद दोस्तम
  • Afghan Freedom Front चे सदस्य
  • नॉर्दर्न अलायन्सशी संबंधित कमांडर

या नेत्यांना पाकिस्तानने सुरक्षित ठिकाण, राजकीय समर्थन आणि त्यांच्या गटांना पाकिस्तान-आधारित कार्यालये देण्याची ऑफर केली असल्याचे समजते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक

 अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाचा मूळ मुद्दा: टीटीपी

पाकिस्तानचा दावा आहे की टीटीपीचे दहशतवादी अफगाणिस्तानातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहेत. तालिबानचा दावा मात्र वेगळा आहे—ते म्हणतात की अफगाण जमिनीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध केला जाऊ देणार नाही. परंतु पाकिस्तान तालिबानवर विश्वास ठेवण्यास तयार नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा ‘काबूलवर हवाई हल्ल्यांची’ शक्यता व्यक्त केली आहे. तालिबाननेही स्पष्ट केले आहे की ते पाकिस्तानच्या दबावाखाली झुकणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष हळूहळू मोठ्या युद्धाच्या दिशेने जात असल्याची चिन्हे दिसत आहेत. दोन इस्लामी राष्ट्रांमधील हा संघर्ष आता भू-राजकीय सामर्थ्याच्या खेळात बदलला आहे. पाकिस्तान सत्तापालटाचा मार्ग निवडेल का किंवा तालिबान कठोर प्रतिकार करेल? पुढील काही आठवडे दक्षिण आशियातील राजकीय आणि सुरक्षा परिस्थिती ठरवणारे ठरू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तान तालिबानविरोधी नेत्यांना मदत का करत आहे?

    Ans: टीटीपी हल्ल्यांमुळे पाकिस्तानला तालिबान शत्रूवत वाटू लागला आहे.

  • Que: पाकिस्तानचा तालिबानला दिलेला ‘अल्टिमेटम’ म्हणजे काय?

    Ans: तालिबानने पाकिस्तानच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा सत्ता बदलाचा प्रयत्न होऊ शकतो.

  • Que: युद्धाची शक्यता किती?

    Ans: सध्या परिस्थिती अत्यंत गंभीर असून दोन्ही बाजू तडजोडीस तयार नाहीत.

Web Title: Pakistan threatens taliban with rival support if demands ignored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Afghanistan taliban
  • International Political news
  • pakistan
  • third world war

संबंधित बातम्या

Chemical Weapons : ‘पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात फॉस्फरस बॉम्ब…’, मीर यार बलोच यांचा आंतरराष्ट्रीय लक्षवेधी दावा
1

Chemical Weapons : ‘पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात फॉस्फरस बॉम्ब…’, मीर यार बलोच यांचा आंतरराष्ट्रीय लक्षवेधी दावा

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर
2

John Kiriakou : भारत पाकिस्तानला हरवेल! Ex-CIA अधिकाऱ्याचा धडाकेबाज दावा; इम्रान पक्षाला दिले धक्कादायक उत्तर

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक
3

S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
4

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.