S400 India : ५०% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
S-400 missile system India expansion : भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रशिया (Russia) भारताला दोन ते तीन अतिरिक्त S-400 क्षेपणास्त्र प्रणाली ( S-400 missile system) पुरवण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, हा प्रस्ताव मे 2025 मध्ये झालेल्या “ऑपरेशन सिंदूर”(Operation Sindoor) नंतर आला आहे, ज्यात भारतीय S-400 प्रणालीने पाकिस्तानच्या लढाऊ विमानांवर ऐतिहासिक कार्यवाही करत जगभरात आपली क्षमता सिद्ध केली होती. या कार्यवाहीमुळे S-400 ला हवाई संरक्षण क्षेत्रातील सर्वात शक्तिशाली प्रणाली मानले जात आहे आणि याच क्षणी रशियाची ही ऑफर भारताच्या संरक्षण धोरणात मोठे पाऊल ठरू शकते.
या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे “Make in India” अंतर्गत ५०% तंत्रज्ञान हस्तांतरणाची ऑफर. या करारानंतर भारतातच S-400 क्षेपणास्त्रांचे घटक, सपोर्ट सिस्टम आणि काही मॉड्यूल्सचे उत्पादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. भारतीय कंपन्यांना या निर्मितीत सहभागी होण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे भारताचे परदेशी लष्करी उपकरणांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. खर्च देखील तुलनेने कमी होईल आणि भविष्यात भारत स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याच्या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकेल.
Russia’s Reported Offer to India 🇮🇳:
🟢6 refurbished Kilo-class subs (6-year delivery timeline)
🟢Another SSN lease (Chakra-III type)
🟢1500 km Kalibr LACMs – Deal Signed
🟢 Upgrades to Indian Kilos to fire missiles from all 6 tubes My Take: ✅ SSN lease only makes sense if… pic.twitter.com/I4gzDUNpLH — Alpha Defense™🇮🇳 (@alpha_defense) July 1, 2025
credit : social media
S-400 प्रणाली भारतीय हवाई दलासाठी “Sudarshan Chakra” मानली जाते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या प्रणालीने फक्त ५ मिनिटांत तैनाती करून पाकिस्तानी विमानांचे लोकेशन मिळवले आणि 300 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून सहा विमानांचा यशस्वी नाश केला. यामध्ये पाकिस्तानचे JF-17, ISR विमान आणि इतर उच्च क्षमतेचे लढाऊ प्लॅटफॉर्म्स होते. S-400 चे “बिग बर्ड” रडार एकाच वेळी 300 हून अधिक लक्ष्यांचा मागोवा घेत होते आणि यामुळेच भारताची ही सिस्टम जगभरात चर्चेत आली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Japan Crisis : ‘चीनने जपानला दिला मोठा धक्का…’आणि भारताची लागली लॉटरी; आता Trump tariffsचे टेन्शनही संपले
भारताने 2018 मध्ये $5.43 अब्ज किंमतीच्या करारांतर्गत पाच S-400 रेजिमेंटची खरेदी केली होती. त्यापैकी तीन रेजिमेंट भारतात तैनात आहेत, तर उर्वरित दोनांची डिलिव्हरी युक्रेन-रशिया युद्धामुळे विलंबित झाली आहे. आता ती डिलिव्हरी 2026 पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. भारताने रशियाला स्पष्ट केले आहे की नवीन करार तेव्हाच अंतिम केला जाईल, जेव्हा विद्यमान सिस्टमची डिलिव्हरी नियोजित वेळेत प्राप्त होईल.
नवीन करारावर चर्चा वेगाने सुरू असून 2026 च्या मध्यापर्यंत करार अंतिम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. करार अंतिम झाल्यास 2029 ते 2030 दरम्यान नवीन रेजिमेंटची डिलिव्हरी सुरू होऊ शकते आणि यासाठी सुमारे 23 अब्ज डॉलर्सचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या करारामुळे भारताची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल आणि चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर भारताला धोरणात्मक आघाडी मिळू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
हा संभाव्य करार केवळ शस्त्र खरेदी नाही, तर भारताच्या स्वावलंबी संरक्षण उत्पादनाच्या दिशेने एक मोठा मैलाचा दगड मानला जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेला आत्मविश्वास आणि रशियाचा तंत्रज्ञान हस्तांतरण प्रस्ताव भारत-रशिया संरक्षण संबंधांना नवीन धोरणात्मक पातळीवर नेऊ शकतो. जर हा करार अंतिम झाला, तर भारत पुढील दशकात जगातील सर्वात मजबूत हवाई संरक्षण नेटवर्क असलेल्या देशांमध्ये गणला जाऊ शकतो.
Ans: 2026 च्या मध्यापर्यंत करार अंतिम होण्याची शक्यता आहे.
Ans: 50% तंत्रज्ञान हस्तांतरण आणि Make in India उत्पादन मॉडेल.
Ans: 300 किमीपेक्षा जास्त अंतरावरून पाकिस्तानी विमानांचा नाश करून जागतिक रेकॉर्ड केला.






