Chemical Weapons : 'पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानात फॉस्फरस बॉम्ब...', मीर यार बलोच यांचा आंतरराष्ट्रीय लक्षवेधी दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistani army chemical weapons Balochistan : पाकिस्तानच्या सैन्यावर (Pakistani army) बलुचिस्तान (Balochistan) आणि खैबर पख्तूनख्वा प्रदेशात मानवाधिकारांचे उल्लंघन, हवाई हल्ले आणि धोकादायक शस्त्रांचा वापर केल्याचे आरोप नवीन नाहीत. मात्र, आता या आरोपांना आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. बलुचिस्तानचे फुटीरतावादी नेते मीर यार बलोच (Mir Yar Baloch) यांनी पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यावर रासायनिक व फॉस्फरस शस्त्रांचा नागरिकांवर वापर केल्याचा धक्कादायक दावा केला आहे. मीर यांच्या मते, या हल्ल्यांमुळे बलुच नागरी लोकसंख्या गंभीर धोक्यात आली आहे, आणि हल्ल्यांच्या ठिकाणी रासायनिक अवशेष, जळून गेलेले खडक आणि राखेसारखी धूळ आढळली आहे. हे तांत्रिकदृष्ट्या फॉस्फरस किंवा इतर रासायनिक घटकांचे चिन्ह असू शकते.
मीर यार यांनी सोशल मीडियावर दावा केला की अलीकडील काही आठवड्यांत बलुचिस्तानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ड्रोन हल्ल्यांची पुष्टी झाली आहे. या भागांमध्ये:
या ठिकाणी पाकिस्तान हवाई दलाने दिवस-रात्र हवाई गस्त वाढवली आहे, तर काही ठिकाणी बॉम्बिंगनंतर आग लागल्याची घटनाही नोंदवण्यात आली आहे. बलुच शस्त्र तज्ञांच्या मते, या हल्ल्यांमध्ये रासायनिक एजंट्स आणि ‘white phosphorus bombs’ वापरण्यात आले असावेत जे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंदी घातलेले आणि युद्धगुन्ह्यांच्या श्रेणीत मोडतात.
Breaking News; 🚨
Pakistan is using CHEMICAL WEAPONS against Baloch people in Republic of Balochistan.
21 November 2025 The Republic of Balochistan has received credible reports of multiple drone strikes conducted across several regions of Balochistan. We call upon… pic.twitter.com/vDvpbQedyW — Mir Yar Baloch (@miryar_baloch) November 20, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S400 India : 50% स्वदेशीकरणासह भारताची मोठी झेप; रशियाची मोठी ऑफर अन् हवाई संरक्षणात महासत्ता बनण्याचा मोदींचा मास्टरस्ट्रोक
“Chemical Weapons Convention (CWC)” अंतर्गत, 1997 पासून रासायनिक शस्त्रे, त्यांचा विकास, साठवणूक आणि नागरी लोकांवर वापर कठोरपणे प्रतिबंधित आहे. पाकिस्तान स्वतः या कराराचा सदस्य देश आहे, त्यामुळे हे दायित्व उल्लंघन मानले जाऊ शकते.
मीर यार म्हणतात:
“जागतिक समुदाय शांत बसला आहे. 2005 मध्ये जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळातही असेच शस्त्र वापरण्यात आले. त्या वेळीही कुणी कारवाई केली नाही. आज परिस्थिती आणखी भयानक व अमानवी झाली आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Japan Crisis : ‘चीनने जपानला दिला मोठा धक्का…’आणि भारताची लागली लॉटरी; आता Trump tariffsचे टेन्शनही संपले
मीर यांनी यु एन ओ, मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय शस्त्र तपास संस्थांना बलुचिस्तान भेट देऊन निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, या हल्ल्यांचा उद्देश बलुच जनतेचा आवाज दाबणे आहे, आणि हे मानवतावादी संकटाचे स्वरूप धारण करत आहे. मीर यार बलोच यांचे हे आरोप पाकिस्तानसाठी गंभीर ठरू शकतात. जर हे आरोप सिद्ध झाले, तर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय युद्धगुन्ह्यांच्या चौकटीत खटला चालविला जाऊ शकतो. मात्र, पाकिस्तानकडून या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
Ans: पाकिस्तानी सैन्यावर रासायनिक आणि फॉस्फरस शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप.
Ans: नाही, Chemical Weapons Convention अंतर्गत त्यांचा वापर प्रतिबंधित आहे.
Ans: बलुच फुटीरतावादी नेते मीर यार बलोच यांनी.






