
Pakistan Aghanistan News
दिल्ली स्फोटाच्या एक दिवसानंतर मंगळवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर कार स्फोट झाला होता. या स्फोटाने पाकिस्तान हादरला होता. मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हा स्फोट झाला, ज्यामध्ये प्राथमिक अहवालात 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि २० ते २५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले जात होते. पाकिस्तानने यासाठी भारताला जबाबदार धरले. तसेच पाकिस्तानने तीव्र संताप व्यक्त केला होता.
मंगळवारी (११ नोव्हेंबर) पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी अफगाणिस्तानवरील दहशतवादी अड्ड्यावर कारवाईबाबत विधान केले. जिओ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना इस्लामाबाद हल्ल्याच्या प्रत्युत्तरावर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ख्वाजा यांनी म्हटले की, अल्लाहची इच्छा असले तर निश्चितच प्रत्युत्तर देऊ. त्यांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ल्याचे संकेतही दिले. त्यांनी म्हटले की, आम्हाला कारवाई करण्यासाठी भाग पाडले जात आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. त्यांनी दावा केला आहे की, कार स्फोटासाठी खारिजाइट बंडखोर जबाबदरा आहे, ज्यांना अफगाण तालिबानचे प्रॉक्सी म्हटले जाते. दिल्लीतील स्फोटानंतर काही तासांनी हा स्फोट झाल्याने आणि भारत-अफगाणिस्तानातील वाढत्या संबंधामुळे पाकिस्तान भारतावर गंभीर आरोप करत आहे.
तर दुसरीकडे ख्वाजा यांनी यासाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरले आहे. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. ख्वाजा यांच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये २०२५ मध्ये ३००० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकिस्तानच्या वेगवगेळ्या भागांमध्ये राहून दहशत निर्माण करत आहेत. शिवाय गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तान अफगाण सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही.
Explainer : पाक-अफगाण तणाव शिगेला! दोन्ही देशांची एकमेकांना युद्धाची उघड धमकी, कोण जिंकेल?
Ans: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला.
Ans: मीडिया रिपोर्टनुसार, इस्लामाबाद कार स्फोटात १२ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे, तर २० हून अधिक लोक जखमी असल्याचे म्हटले जात आहे.
Ans: पाकिस्तानने इस्लामाबाद कार स्फोटासाठी भारताला जबाबदार धरले आहे.