Pakistani experts warn Shahbaz Take India's warning seriously three key reasons
Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचे बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण गडद झाले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतला, आणि यामुळे पाकिस्तानसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पाकिस्तानी तज्ज्ञांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताच्या इशाऱ्याला हलक्यात घेणे पाकिस्तानसाठी अतिशय घातक ठरेल, आणि त्यांनी यामागची तीन महत्त्वाची कारणेही मांडली आहेत.
पाकिस्तानी तज्ज्ञ उमर फारूख यांनी ‘फ्रायडे टाईम्स’ या माध्यमातून स्पष्ट केले की, भारताने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. अमेरिकेकडून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्रे भारताने मागील पाच वर्षांत खरेदी केली आहेत. याशिवाय फ्रान्स आणि इस्रायल यांच्याकडूनही अत्याधुनिक लष्करी उपकरणांची खरेदी सुरु आहे. यामुळे भारताने आपली लष्करी क्षमता प्रचंड वाढवली असून, पाकिस्तानच्या तुलनेत स्पष्ट लष्करी श्रेष्ठता मिळवली आहे. भारतीय लष्करी रणनीतीकार आता केवळ संरक्षणापुरतेच नव्हे तर आक्रमक धोरणासाठीही सज्ज आहेत. त्यामुळे पाकिस्तानने यावेळी भारताच्या इशाऱ्याला दुर्लक्ष करणे आपल्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते, असे फारूख यांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाण्यानंतर आता पाकिस्तान ‘या’ महत्वाच्या गोष्टीसाठीही तरसणार; भारताचा आणखी एका क्षेत्रावर घाला
तज्ज्ञांनी दुसरे महत्त्वाचे कारण असे सांगितले की, आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात कमकुवत देशांवर बलाढ्य राष्ट्रांचे आक्रमण हे सहजतेने स्वीकारले जाते. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष याचे जिवंत उदाहरण आहे. आज वॉशिंग्टन, तेल अवीव आणि पॅरिस यांच्याशी भारताचे घनिष्ट संबंध आहेत. ही शहरे केवळ भारताला शस्त्रास्त्रे पुरवत नाहीत तर राजकीय पातळीवरही भारताला जोरदार पाठिंबा देतात. त्यामुळे पाकिस्तानने जर भारताचा इशारा दुर्लक्षित केला, तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सहानुभूती मिळण्याची शक्यता अत्यंत क्षीण आहे.
तिसरे आणि सर्वांत गंभीर कारण म्हणजे, पूर्वी जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी तणाव वाढायचा, तेव्हा अमेरिका आणि पश्चिमी देश मध्यस्थी करत युद्ध रोखायचे. १९८७ पासून ते कारगिल युद्धापर्यंत प्रत्येक संघर्षात वॉशिंग्टनने हस्तक्षेप केला होता. मात्र, आजची परिस्थिती बदलली आहे.
वॉशिंग्टनची धोरणात्मक शाखा सध्या भारतासोबत संयुक्त लष्करी नियोजनावर चर्चा करत आहे. एफबीआय आणि राष्ट्रीय गुप्तचर सेवा यांचे वरिष्ठ अधिकारी भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत, जर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली, तर यावेळी पाकिस्तानला कोणतेही आंतरराष्ट्रीय दबाव गट वाचवू शकणार नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपामुळे नाही, तर ‘या’ रहस्यमयी कारणांमुळे थरथरतेय धरती…’ संशोधनातून धक्कादायक गुढ उघड
भारतातील वाढत्या लष्करी सामर्थ्याच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकीय पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने भारताच्या चेतावणीला गांभीर्याने घेणे अत्यावश्यक आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया केवळ आक्रोशापुरती मर्यादित न राहता व्यवस्थित नियोजनबद्ध प्रतिहल्ला असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने भविष्यातील कोणतीही चूक टाळण्यासाठी अतिशय सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा परिणाम गंभीर असू शकतात.