Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला दहशतवाद्यांचा आला पुळका; ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या शाहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी

भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यात बळी गेल्या 28 निरापराध लोकांना 'ऑपरेशन सिंदूर' न्याय मिळवून दिला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे. बिथरलेला पाकिस्तान भारताला केवळ पोकळ धमक्या देत आहे. 

  • By स्वराली शहा
Updated On: May 08, 2025 | 12:49 PM
Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's threatns to India says We will avenge every drop of the blood of martyrs'

Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's threatns to India says We will avenge every drop of the blood of martyrs'

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यात बळी गेल्या 28 निरापराध लोकांना ‘ऑपरेशन सिंदूर’ न्याय मिळवून दिला. भारतीय लष्कराने मंगळवरी मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या भागातील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे. बिथरलेला पाकिस्तान भारताला केवळ पोकळ धमक्या देत आहे.

भारताला मोठी किंमत मोजावी लागेल

या हलल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ अस्वस्थ झाालेले आहेत. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा भारतला धमकी दिली आहे. शाहबाज यांनी म्हटले  आहे की, “भारताने मोठी चूक केली आहे. शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल. भारताला मोठी किंमत मोजावी लागेल.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘Operation Sindoor’ ने उघड केला पाकिस्तानचा खरा चेहरा; दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत लष्कर दिसले अश्रू ढाळताना

या दहशतवादी संघटनांवर भारताचा हल्ला

भारतीय लष्कराच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुदाहिदिन या दहशतवादी संघटनांना लक्ष्य केले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील  मुरिदके, बहावलपूर, कोटली, मुजफ्फरबाद, आणि सियालकोट या ठिकाणच्या दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला. जैशचे बहावलपूर येथील मरकज सुभान अल्लाह, कोटीलचे मरकज अब्बास तेहरा कलां आणि मुजफ्फरबादमधील सैदन बिलाल कॅम्प या कारवाईत रद्द करण्यात आला.

दहशतवाद्यांच्या यात्रेत पाकिस्तानी लष्कर

याच दरम्यान दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी लष्कर अश्रू ढाळताना दिसून आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अंत्ययात्रेत पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ कमांडर हाफिज अब्दुला, तसेच पंजाब प्रांतातील पोलिस महासंचालक उपस्थित होते. ही माहिती पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी दिली आहे.

शाहबाज यांनी दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हल्ल्यात बळी गेलेल्या शहीदांच्या (दहशतवादी) रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल अशी धमकी भारताला दिला आहे.

यावरुन पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा जगासमोर येतो. स्वत:ला दहशतवादाचा बळी समजून घेणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हल्ल्यात बळी गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले होते. या सर्व घटनांवरुन लक्षात येते की, पाकिस्तना दहशतवाद्यांना पोसत आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिका, रशिया, या महसत्ता देशांनी दोन्ही देशांना शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्यास म्हटले आहे. तसेच तुर्की आणि चीन वगळता इतर मुस्लिम देशांनी पाकिस्तानची साथ सोडली आहे. इतर मुस्लिम देशांनी देखील भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगून संवादाच्या मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Operation Sindoor: पाकिस्तानला आणखी एक झटका; ‘या’ मुस्लिम देशानेही सोडली साथ

Web Title: Pakistani prime minister shahbaz sharifs threatns to india says we will avenge every drop of the blood of martyrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.