Operation Sindoor: पाकिस्तानला आणखी एक झटका; 'या' मुस्लिम देशानेही सोडली साथ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 15 दिवसांत बदला घेतला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते केली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरच्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले केले आहे. याच हल्ल्यात 100 हून अधिक नागरिक ठार झाले असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुडीं उडालेली आहे. भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले आहे.
या हल्ल्यानंतर देशभरातून विविध प्रतक्रिया येत आहे. भारताच्या या कारवाईनंतर मुस्लिम देशाने देखील पाकिस्तानची साथ सोडली आहे. मुस्लिम देशांमध्ये पहिली प्रतिक्रिया संयुक्त अरब अमिराती(UAE) कडून आली आहे. यूएई ने दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Operation Sindoor: ड्रॅगनने काढला विषारी फणा; पाकिस्तानला पाठिंबा देत भारतीय लष्करी कारवाई म्हटले ‘खेदजनक’
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला होता. या निष्पाप लोकांच्या रक्ताचा बदला अखेर भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवत घेतला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिका, चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच संवादाच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासा सांगितले आहे.
याच वेळी पाकिस्तानला मुस्लिम देशाच्या पाठिंब्याची आशा होती. परंतु पाकिस्तानच्या या आशेवर पाणी फेरले आहे. मुस्लिम देश यूएईने भारताच्या दहशतवादाच्या कारवाईवर उघडपणे वक्तव्य केले नाही. परंतु यूएईने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तुर्की ने देखील पाकिस्तानशी चर्चा केली आहे. यामुळे पाकिस्तानची मुस्लिम देशांकडून मदतीची आशा धुळीस मिळाली आहे.
यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान यांनी भारता आणि पाकिस्तानला संयम बाळगण्यास सांगितले आहे. त्यांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय तणावात वाढ होणार नाही यासाठी शांततेचा मार्गाने प्रश्न सोडवावेत. तणाव टाळण्यासाठी संवाद आणि समंजस्यपणाने चर्चा करण्याचे आवाहन यूएई केले आहे.
तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान आणि यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी खोनवरुन चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली. सध्या या चर्चाेचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही. यामध्ये पाकिस्तानला तुर्कीची साथ मिळण्याची शंका तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
भारत सरकारने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवरील हल्ला होण्यापूर्वी याची माहिती सौदी अरेबियाला दिली होती. तसेच अमेरिक, रशिया, ब्रिटन, आणि सौदी सारख्या प्रमुख देशांना ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली होती. अमेरिका आणि चीननेही दोन्ही देशांना शांततेने तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.