Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War: पाकिस्तानचा डबल गेम? पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून इराणवर हल्ला

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मुनीर आणि ट्रम्प यांच्या दुपारच्या जेवणाची आणि भेटीची सतत चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 22, 2025 | 03:16 PM
Iran-Israel War: पाकिस्तानचा डबल गेम? पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून इराणवर हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

Iran-Israel War:   अमेरिकेने रविवारी इराणमधील तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केले असल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. खोरासान व्हॉइस या वृत्तसंस्थेने इराणच्या सूत्रांचा हवाला देत, हा हल्ला करताना अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असा दावा केला आहे.

२१ जून रोजी अमेरिकन हवाई दलाच्या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी मोंटाना येथील तळावरून उड्डाण केले आणि ग्वामच्या दिशेने निघाले, असेही म्हटले जात आहे. यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून इराणच्या अणु सुविधांवर हल्ले चढवले. मात्र, या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, या हल्ल्याचा पाकिस्तानने तीव्र निषेध केला आहे. अधिकृत निवेदनात पाकिस्तानने हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, या कारवाईत पाकिस्तानने अप्रत्यक्षरित्या सहकार्य केल्याचा आरोप इराणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे इराण आणि अमेरिकेसोबत डबल गेम करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Hindi Language News: हिंदी भाषा सक्तीबाबत खोटे विधान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस

असीम मुनीर- डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी गेल्या आठवड्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मुनीर आणि ट्रम्प यांच्या दुपारच्या जेवणाची आणि भेटीची सतत चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण इराणवर हल्ला झाल्यास डोनाल्ड ट्रम्प  पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल नक्कीच बोलले असते, असे अनेक तज्ञांचे मत आहे. पण ट्रम्प यांनी मुनीर यांचे कौतुक केले आहे. मुनीरच्या कौतुकाच्या बदल्यात अमेरिकेने पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याचा  करार केला असण्याची शक्यता आहे. इरामवरील हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृतपणे काही गोष्टी उघड झालेल्या नाहीत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर, फर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर हल्ला केला आहे.  ‘आम्ही इराणच्या तीन अणुस्थळांवर यशस्वीरित्या हल्ले केले आहेत. बॉम्ब टाकल्यानंतर, सर्व अमेरिकन विमाने सुरक्षितपणे परतत आहेत. आता शांततेची वेळ आहे. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीरही केलं.

Bihar Election 2025 : गरीब कुटुंबाना मिळणार 2 लाख रुपये; नितीश कुमारांची घोषणा, नक्की काय आहे योजना?

इराणचा अमेरिकेवर संताप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी अमेरिकेवर संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांनंतर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमचा सदस्य असलेल्या अमेरिकेने इराणच्या शांततापूर्ण अणुप्रकल्पांवर हल्ला करून संयुक्त राष्ट्रांच्या चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि एनपीटीचे गंभीर उल्लंघन केल्याच आरोप केला आहे.

Web Title: Pakistans double game iran claims to have attacked using pakistani airspace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Iran-Israel War
  • pakistan

संबंधित बातम्या

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला
1

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
2

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
3

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
4

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.