Palestinians will be displaced from Gaza City Trump-Netanyahu plan to resettle people in African country
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान यांनी गाझातील पॅलेस्टिनींच्या पुनर्वसानासाठी आफ्रीकन देशांशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एकीकडे अरब देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॅलेस्टिनी लोकांना इतर देशांत विस्थापित करण्याच्या निर्णायवर विरोध केला होता. यासाठी अरब देशांच्या प्रतिनिधींची एक बैठकही झाली होती. मात्र, ट्रम्प यांनी तरीही पॅलेस्टिनींचा पुनर्वसनाचा निर्णय रद्द केला नाही. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर अरब-युरोप देश आणि अमेरिकेत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावर टीका
दरम्यान अमेरिका आणि इस्त्रायलने आफ्रीकन देशांशी संपर्क साधला असून यामध्ये सुदान, सोमालिया आणि सोमालियाचा दुसरा भाग सोमालीलॅंडचा समावेश आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी गाझाच्या पुनर्वसनाची योजना मांडली होती त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. याच वेळी सुदान, सोमालिया आणि सोमालीलॅंड हे आर्थिक दृष्ट्या कमकुवत प्रदेश आहे. तसेच या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिसांचाराच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॅलेस्टिनींच्य या भागांतील पुनर्वसनावर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेत नैसर्गिक आपत्तीचा कहर; ‘या’ भागांमध्ये प्रचंड हानीची शक्यता
आफ्रीकन देश सुदानने दिल नकार
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सुदानशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या पॅलेस्टिनींच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाला सुदानी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. तर सोमालिया आणि सोमालीलॅंडने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ट्रम्प यांची योजना
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा युद्धोत्तर योजनेनुसार, गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवणे, तेथील 20 लाखाहूंन अधिक पॅलेस्टिनींना विस्थापित करणे आणि मध्ये पूर्वेतील रिवेरा म्हणून विकसित करण्याची योजना आहे.
ट्रम्प यांच्या योजनेला पॅलेस्टिनींचा विरोध
मात्र, गाझा पट्टीतील लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला तीव्र निषेध केला आहे. तसेच दुसरीकडे, अरब देशांनी याच्या उलट एक नवीन अरब योजना देखील तयार केली होती.
अरब देशांची योजना
इजिप्तमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझाचे पुनर्वसन आणि अमेरिकेचा त्यावर ताबा याला विरोध करण्यासाठी 04 मार्च 2025 रोजी अरब नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत गाझा पट्टी रिकामी करुन त्याला पर्यटन स्थळ बनवण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पर्याय म्हणून एक विरोध प्रस्ताव सादर करण्यात आला.