पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची हत्या; पाकिस्तानात घातल्या गोळ्या

विदेशात बसून भारताविरोधात कटकारस्थान रचणारे दहशतवादी व गँगस्टर्सचा अज्ञात हल्लेखोरांतर्फे खात्मा करण्यात आला आहे. याच क्रमवारीत आता पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानातील सियालकोट येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.

    इस्लामाबाद : विदेशात बसून भारताविरोधात कटकारस्थान रचणारे दहशतवादी व गँगस्टर्सचा अज्ञात हल्लेखोरांतर्फे खात्मा करण्यात आला आहे. याच क्रमवारीत आता पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ (Shahid Latif) याची पाकिस्तानातील सियालकोट येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. त्याच्यासोबत त्याचे दोन साथीदारही ठार झाले आहेत.

    ज्याप्रमाणे कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर आणि गँगस्टर सुखदूल सुक्खाचा खून झाला त्याच धर्तीवर शाहिदचाही गेम करण्यात आला आहे. शाहिद तालिफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथील रहिवासी होता. तो जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होता. तो सियालकोट सेक्टरचा कमांडर होता.

    मशिदीत केला गेम

    शाहिद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या आश्रयाला होता. तेथूनच तो भारतविरोधी कारस्थाने रचत होता. भारताविरोधात त्याने अनेक षडयंत्रे रचली. नित्यनेमानुसार तो बुधवारीही सकाळी नमाज पठणासाठी मेडकी चौकातील नूर मशिदीत पोहोचला होता. त्यावेळी त्याच्यासोबत दोन साथीदारही होते. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.