फोटो सौजन्य सोशल मीडिया
फ्रान्समधली पोरं आता सरकारला ऐकत नाहीत जुमानत नाहीत . हे आंदोलन वाढत जाऊन आता फ्रान्समधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पर्यंत पोहोचले आहे . विद्यार्थ्यांनी आयफेल टॉवरच्या खाली असणाऱ्या मोकळ्या जागेत एक चारचाकी वाहन सुद्धा पेटवलेले आहे . याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हयरल झाला आहे .
या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला फ्रान्समधील सर्वच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरवात केली आहे . याचवेळी इतरही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनाही यात हस्तक्षेप करावा लागला आहे . पण सध्या तरी विद्यार्थ्यांना अटक किंवा लाठीचार्ज केल्याचे वृत्त आले नाही .
Breaking News: जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्यांपैकी एक म्हणजे शिक्षकांची कमतरता .अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे तास रद्द होतात किंवा त्यांचे नियमित शिक्षण प्रभावित होते . त्याबरोबर काही शाळांमध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याची तक्रार आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे . शाळांच्या इमारती आणि मूलभूत सुविधांबाबतही अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे .
फ्रान्समधील विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठ प्रवेश प्रक्रियेबाबत अस्वस्थता आहे . उच्च माध्यमिक शिक्षणानंतर विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Parcoursup प्रणालीमुळे विद्यार्थ्यांवर मोठा दबाव येत असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे . प्रवेशाच्या संधी , शैक्षणिक असमानता आणि भविष्यातील करिअरबाबत असुरक्षितता यामुळे विद्यार्थ्यांचा तणाव वाढत आहे . त्यामुळे शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे .
विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी शाळांच्या गेटवर निदर्शने केली असून काही शाळा बंद ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला . काही भागात पोलीस आणि आंदोलनाकर्त्यांमध्ये संघर्ष सुद्धा झाला पण यात कोणालाही इजा झाली नाही . आगजनी आणि तोडफोडीच्या घटनांनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे . सरकारसमोर आता आंदोलन शांत करण्यासोबतच शिक्षण व्यवस्थेतील या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आव्हान उभे राहिले आहे .






