US Stock Market Crash: American stock market in turmoil! Tech stocks collapse, (photo-social media)
US Share Market Crash: अमेरिकन शेअर बाजारात हाहाकार माजवला आहे. अमेरिकेतील मोठे शटडाऊन संपल्याने गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल सरकारचे कामकाज सुरु करण्यासाठी तब्बल 43 दिवसांनी विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये भूकंप आला. ज्यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.
अमेरिकन शेअर बाजारात Dow Jones सलग पाचव्या दिवशी 800 अंकांनी जोरात आपटला. पूर्वी बाजार विक्रमी उच्चांक गाठताना अचानक आज बाजाराचा वेग मंद झाला. S&P500 निर्देशांक 1.5% हून देखील घसरल्याने मोठा धक्का बसला आहे. तर नॅसडॅक कंपोझिट 2 टक्क्यांहून घसरून बंद पडला.
हेही वाचा : Share Market Crash: बिहार निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर तगडा परिणाम! भारतीय बाजार उघडताच घसरला
अमेरिकन शेअर बाजारात विक्री सुरू असून त्याचा परिणाम थेट नॅसडॅकवर दिसत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील या घटामुळे सलग पाचव्या दिवशी नॅसडॅक बंद झाला. जागतिक गुंतवणूकदारांसाठी टेक सेक्टरमधील मोठी पडझड धोक्याची घंटा ठरु शकते. ओव्हर-एग्झुबेरन्स AI संबंधीत कंपन्या थंड झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात ओरेकलने OpenAI सह फायदाचा करार केला होता, ज्यामुळे एका दिवसात कंपनीचे शेअर्स तब्बल 36% वर आले होते. मात्र, सध्या टेक शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग स्टार्ट झाल्याने ॲपल, गुगल सह मायक्रोसॉफ्ट आणि ओरेकल सारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स प्रचंड कोसळले आहेत. या सेलिंगपासून क्रिप्टोकरन्सी मार्केटही सुटू शकले नाही.
तसेच, इतिहासातील अमेरिका सर्वात मोठ्या सरकारी शटडाऊनचा शेवट हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट बनला. वॉल स्ट्रीट शटडाऊन संपताच नवीन आर्थिक डेटासाठी सज्ज आहे. व्हाईट हाऊसने रोजगार डेटामधील माहिती देणार नसून त्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नसल्याने गुंतवणूकदार सावध झाले आहेत.
हेही वाचा : Samsung TV युजर्ससाठी खूशखबर! सॅमसंग टीव्ही प्लसचा टॉप क्रिएटर्ससोबत करार
दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या डिसेंबरमधील व्याजदर कपातीबाबतच्या शक्यता अधिक धूसर होत आहेत. किमान पाच फेड अधिकाऱ्यांनी दरकपात लवकर असल्याचे स्पष्ट केले असून काहींनी 10 डिसेंबरच्या प्रस्तावालाही विरोध दर्शविला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे.
अमेरिकन बाजारातील या भीषण घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल येत असल्याने देशांतर्गत बाजार आणखी दबावाखाली आले. ओपनिंगला सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल रंगातच व्यापार करत होते. विशेषतः IT स्टॉक्सवर अमेरिकन घसरणीचा तगडा परिणाम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.






