PIB debunks fake news, IAF Squadron Leader Shivani Singh NOT captured in Pakistan
नवी दिल्ली: पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य केले आणि उखडून टाकले. यानंतर पाकिस्तान बिथरला गेला. दरम्यान यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले. याच दरम्यान सोशल मीडियाद्वारे काही अफवा देखील पसरवल्या जात आहे.
S-400 च्या नुकसानीची अफवा भारतीय लष्कराने खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने फॅक्टचेक युनिटने सोशल मीडियावरील सर्व खोटे दावे मोडून काढले आहेत.पीआयबी फॅक्ट चेकने भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दाव्याचे खंडन केले आहे.
पाकिस्तान समर्थित काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर भारतीय हवाई दलाच्या महिला पायलट, स्क्वॉड्रन शिवानी सिंग पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा केला जात होता. परंतु पीआयबी फॅक्ट चेक युनिटने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. पीआयबीने केलेल्या तपासणीदरम्यान हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
पीआयबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये महिला पायलट स्क्वॉड्रन सुरक्षित असून पाकिस्तानच्या ताब्यात नसल्याचे सांगण्यात आले आहे.
Indian Female Air Force pilot has NOT been captured🚨
Pro-Pakistan social media handles claim that an Indian Female Air Force pilot, Squadron Leader Shivani Singh, has been captured in Pakistan.#PIBFactCheck
❌ This claim is FAKE!#IndiaFightsPropaganda@MIB_India… pic.twitter.com/V8zovpSRYk
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025
आणखी एका पोस्टमध्ये पीआयबीने नागरोटा हवाई तळावरील पाकिस्तानने हल्ला केल्याचा दाव्याचे खंडन केले आहे. हा व्हिडिओ जुना असून एडिट केलेला व्हिडिओ असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. तसेच पीआयबीने लोकांना अधिकृत माहिती स्त्रोंतवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी किंवा ती वाचून त्याबद्दल फॅक्ट चेक करण्यास पीआयबीने म्हटले आहे.
Heard of attack on Nagrota Air Base❓BEWARE‼️
An old and digitally altered video is being falsely circulated as footage of a Pakistani attack on the Nagrota Air Base.#PIBFactCheck
✅ This video was originally posted on Instagram in October 2024.
🔗 Watch:… pic.twitter.com/eO0o5njfRi
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025