Fact Check : भारताच्या S-400 डिफेन्स सिस्टिमचं नुकसान केल्याचा पाकिस्तानचा दावा; भारतीय सेनेने केली पोलखोल! काय आहे सत्य? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: पहलगामच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. भारताविरोधात पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान भारताच्या अनेक शहरांवर हल्ला करण्याच प्रयत्न करत आहे. पण भारताने पाकिस्तानचे अनेक हल्ले नाकाम केले आहेत. काऊंटवर बॅक साठी भारताने S-400 संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. या संरक्षण प्रणालीमुळे भारत अनेक हल्ले हाणून पाडण्यात यशस्वी झाले आहे. परंतु याच दरम्यान पाकिस्तानने एक खोटा दावा केला होता. हा दावा भारताने मोडून काढला आहे.
भारताच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी हे दावे निराधार असल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानने भारताची S-400 संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. परंतु भारताने हे दावे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितेले आहे की, s-400 संरक्षण प्रणालीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. पाकिस्तानने केलेले S-400 बाबतचे सर्व दावे खोटे आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात S-400 चे नुकसान झाल्याचा दावा केला जात होता. हा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. परंतु हा दावा खोटा असल्याचे भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांनी उघड केले आहे.
सध्या दोन्ही देशातील तणाव वाढत चालला आहे. याच दरम्यान आज पहाटे भारतीय हल्ल्यांमध्ये चार पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC)अनेकत ठिकाणी हल्ले केले असून अधूनमधून गोळीबार सुरुच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पाकिस्तानने भारताच्या 26 ठिकाणांना लक्ष केले. मात्र भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, “पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे 26 ड्रोन दिसले. बारामुल्ला, श्रीनंगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाकोणट, फाजिल्का, लालगड, जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज्ज, कुआरबेट आणि लाखी नाला या भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले.
निवेदनानुसार, एका सशस्त्र ड्रोनने फिरोजपूरच्या एका नागरी भागाला लक्ष्य केले. यामुळे एक स्थानिक कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. तसेच सुरक्षा दलांनी तातडीने परिसर रिकामा करत नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
भारताचे सशस्त्र दला हाय अलर्ट मोडवर असून सर्व संभाव्य हवाई धोक्यांचा मागोवा घेत आहे. यामध्ये ड्रोनविरोधी प्रणालींचा वापर करुन हवाई सशस्त्रांचा शोध घेतला जात आहे. भारतीय संरक्षण दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आश्यकतेनूसार तातडीने कारवाई करत आहे.
भारताच्या संरक्षण दलाने नागरिकांना, मुख्यत: सीमावर्तीत भागातील लोकांना घरात राहण्याचा,आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सुचनांचे पालने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सुरक्षा दलाने नागरिकांना घाबरुन न जाण्याचे सांगितले आहे, तसेच दक्षथ आणि खबरदारी घेण्यासही सांगितले आहे.