Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi G7 Summit : G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल; भारतीय समुदायाकडून जोरदार स्वागत

PM Modi G7 Summit Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असून ते फ्रान्सच्या दौऱ्यासाठी नीस शहरात दाखल झाले आहेत. येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून भारतीय समुदायाने यावेळी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 10:44 AM
PM Modi France Visit

PM Modi France Visit

Follow Us
Follow Us:
  • G7 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये दाखल
  • भारतीय समुदायाकडून जोरदार स्वागत
  • राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार
PM Modi G7 Summit News Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आपल्या पाच दिवसीय परदेशी दौऱ्यावर गेले आहेत. सुरुवातील ते फ्रान्सला भेट देणार असून नीस शहरात दाखल झाले आहेत. येथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्य इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा होईल. याशिवाय ते जागतिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बहुपक्षीय G-7 शिखर परिषदेतही १६ आणि १७ जून रोजी सहभागी होणार आहेत. याचा उद्देश नवोपक्रम आणि विकासाच्या क्षेत्रात प्रमुख भागीदारांशी संबंध अधिक दृढ करणे आहे.

Iran-US War : होर्मुज स्ट्रेटमध्ये जहाजांवर इराण लादू शकतो शुल्क; आता आणखी फटका बसणार?

नीसमध्ये पंतप्रधानांचे भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी नीसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ दा अजूर वर पोहोचताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी फ्रान्सचे अनेक मंत्री आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते. ज्यामध्ये फ्रान्सचे शिक्षण मंत्री, एडुआर्ड ग्रेफे, उच्च शिक्षण आणि संशोधन मंत्री फिलिपि बाप्टिस्ट आणि नीसचे महापौर एरिक सिओटी यांनी पंतप्रधान मोदींचे विशेष स्वागत केले. तसेच भारतातील फ्रान्सचे राजदूत थिएरी माथू देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

भारतीय समुदायाकडूनही जोरदार स्वागत

तसेच नीसमध्ये राहाणाऱ्या भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधान मोदींची जोरदार स्वागत करण्यात आले. उपस्थितांनी तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त करत, परदेशात राहूनही मातृभूमीशी असलेले भारतीय समूदायाचे नाते अतूट असल्याचे म्हटले.

तसेच नीस सीटी हॉलमध्येही हॉलवरही पंतप्रधान मोदींच्या स्वागतानिमित्त भारतीय तिरंगा फडकवण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विदेश नेत्याला दिला जाणारा हा विशेष सन्मान मानला जातो.

Je viens d’atterrir à Nice. Outre Nice, cette visite en France comprend des programmes à Évian et à Paris. Elle sera marquée par des rencontres bilatérales et multilatérales, visant à renforcer les liens d’amitié de l’Inde avec ses partenaires clés en matière de développement.… pic.twitter.com/hB9zCWoWoZ — Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांची भेट

दरम्यान पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuele Macron) यांची भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेते भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर चर्चा करतील. संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष आणि जागतिक सहकार्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

इनोव्हेट्स कार्यक्रामाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदी भारत इनोव्हेट्स या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहे. भारत, फ्रान्स आणि इतर देशांतील स्टार्टअप्स, इनोव्हेशन कंपन्या आणि वेंचर कॅपिटल फंड सहभागी होणार आहे. नव्या भागीदारी आणि गुंतवणूकींच्या संधीवर या कार्यक्रमात चर्चा केली जाईल. यानंतर ते युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियाला १४-१५ जून रोजी भेट देतील.

A memorable welcome from the Indian community in Nice. Though they may be several kilometres away from home, the bond of our diaspora with India remains as strong as ever. pic.twitter.com/CGEkEWyjLV — Narendra Modi (@narendramodi) June 13, 2026

Belfast Violence : आयर्लंडमध्ये आयरिश व्यक्तीवर हल्ल्यानंतर हिसेंचा भडका; स्थलांतरितांविरोधात तीव्र निदर्शने, घरांवर हल्ले अन्…

Web Title: Pm modi arrives france g7 summit indian community welcomes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • France
  • G-7 summit
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.