PM Modi Brasila Visit PM Narendra Modi receives a special welcome in Brazil
PM Modi Brasila Visit : ब्राझीलिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या राज्य दौऱ्यासाठी ब्राझीलमध्ये पोहचले आहेत. यावेळी ब्राझीलची राजधानी ब्राझीलियामध्ये पंतप्रधान मोदींचे विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले आहे. ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मुसिओ मोंटेइरो फिल्हो यांनी त्यांचे स्वागत केले. पारंपारिक ब्राझिलियन सांबा रेगे नृत्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेले शिव तांडव स्तोत्र देखील सादर करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी नुकताच त्यांचा रिओ दि जानेरोचा ब्रिक्स परिषदेचे दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्यानंतर ब्राझीलियाला पंतप्रधान मोदी पोहोचले आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदीं ब्राझीलियाला दौऱ्यासाठी गेले आहेत.परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर यासंबंधी माहिती शेअर केली आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्राझीलमधील संबंध मजबूत करण्याच्या दिशेने चर्चा करण्यात येणार आहे.
Taking new strides in 🇮🇳-🇧🇷 steadfast partnership. PM @narendramodi has landed in the capital city of Brasilia on a State Visit to Brazil. On arrival, he was warmly received by Mr. José Múcio Monteiro Filho, Minister of Defence of 🇧🇷, at the airport. The welcome was made… pic.twitter.com/xaGiF1d8HA — Randhir Jaiswal (@MEAIndia) July 7, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांच्यामध्ये ब्राझिलीयामध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर दिला जाईल. यामध्ये भारत आणि ब्राझीलच्या संबंधामध्ये अधिक सुधारण्या करण्यासाठी विविध पैलूंवर चर्चा करण्यात येणार आहे. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी ९ जुलै रोजी नामिबियाला भेट देणार आहेत.
#WATCH | Brazil | Prime Minister Narendra Modi witnesses a spiritual performance as he arrives at a hotel in Brasilia. (Source: ANI/DD) pic.twitter.com/mwLgn9xmM9 — ANI (@ANI) July 7, 2025
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरोला भेट दिली. ही भारतासाठी अत्यंत यशस्वी ठरल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. त्यांनी सांगितले की, ब्रिक्स शिखर परिषदेत इतर देशांच्या अध्यक्षांशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमुळे भारताचे जगातील विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लूला आणि ब्रीझाल सरकारला त्यांच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात प्रभावी बनवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केली. तसेच पंतप्रधान मोदींनी सांगतिले की, या द्विपक्षीय बैठकीमुळे भारताची जागतिक देशांशी मैत्री अधिक दृढ होईल.