अमेरिकत जमिनी खाली दडलंय आणखी एक शहर; संशोधकांची अद्भूत कामगिरी एकदा वाचाच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आपल्या पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचा शोध अद्याप लागेलाल नाही. यासाठी गेल्या अनेक दशकांपासून संशोधनही सुरु आहे. गेल्या अनेक दशकांपासून पुरातत्वशास्त्रज्ञ जुन्या राहिणीमानाच्या, जीवनशलैच्या देखील शोधात आहेत. डायनॉसॉरसच्या शोधापासून ते मानवी गोष्टींच्या अवशेषांचा शोध अनेक काळापासून घेतला जात आहे. नुकतेच अमेरिकेच्या पेरुमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांनाच एका हरवलेल्या शहराचा शोध लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या पेरुमध्ये सर्वात ३,५०० हजार वर्षापूर्वीच्या प्राचीन शहराचा शोध लागला आहे. हे शहर पेरुच्या बारांका प्रांताच्या उत्तरेकडली भागात आहे. पेनिको असे या शहराचे नाव असून हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंच टेकडीवर आहे. या शहराच्या शोधासाठी संशोधकांना ८ वर्षे लागली आहे. हे शहर लिमाच्या उत्तर भागाकडे २०० किलोमीटर अंतरावर आहे. दावा केला जात आहे की, १८०० ते १५०० ईसापूर्व दरम्यान हे शहर वसलेले असावे.
पेनिको शहर हे केवळ रहिवासी शहर नव्हते. हे शहर एक मोठे व्यापारी केंद्र असेल असे संशोधकांनी म्हटले आहेत. या शहरात मोठ्या बाजारपेठांचे अवशेष सापडले आहेत. हे शहर प्रशांत महासागराच्या किनाऱ्यांला ॲंडीज पर्वतरांग आणि ॲमेझॉनच्या खोऱ्याशी जोडले गेलेले आहे. याच भागातून व्यापार सुरु होता, असे संशोधकांनी म्हटले आहे. पेनिकोमध्ये शहरातून शंखांचे हार, मातीच्या मुर्ती, शंखांचे दागिने सापडले आहे. यामधून धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडते.
संशोधकांच्या मते, पेनिको शहराचे कॅरल सभ्यतेशी घनिष्ठ संबंध आहे. कॅरल ही सभ्यता अमेरिकेतील सर्वात प्राचीन सभ्यता मानली जाते. सुमारे पात हजरा वर्षापूर्वी सुपे खोऱ्.यात या सभ्यतेचा उदय झाला होता. यामध्ये भव्य पिरॅमिड्स, सिंचन व्यवस्था आणि शहरीकरणाचे दृश्य यातून स्पष्ट होते. डॉ. रुख शेडी हे कॅरल सभ्यतेचे अभ्यासक आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पेनिकोचा शोध कॅरल सभ्यतेच्या समाजासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. ही संस्कृती इजिप्त, सुमेरिया, भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीस समान आहे.
इ.स. पूर्व १५०० ते १८०० च्या दरम्यान पेनिकोचा विकास सुरु होता, याच वेळी आशिया आणि अरबस्तानमध्येही प्राचीन संस्कृती विकसित होत होत्या. यावरुन जगभरातली मानवी समाज सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि सामान होता, हे यावरुन दिसून येते. या शोधामुळे अमेरिकेत अत्याधुनिक सामाजिक संरचना आणि व्यापारी मार्ग अस्तित्वात होते हे स्पष्ट होते.